Cow Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोहत्या आणि गोमांस विक्रीप्रकरणी चांदोर येथून एकाला अटक

Goa Crime News: संशयिताला मडगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Pramod Yadav

Goa Crime News

मडगाव: गोहत्या आणि गोमांस विक्रीप्रकरणी चांदोर येथून एकाला अटक करण्यात आली आहे. मायणा कुडतरी पोलिसांनी रविवारी (०१ डिसेंबर) ही कारवाई केली. चांदोर येथे २९ नोव्हेंबर सकाळी सहा ते ९ च्या दरम्यान ही घटना घडली.

मलिकजान बेपारी असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीकडे एक गाय आढळून आली. गायीची कत्तल करुन त्यानंतर मांसाची अवैधपणे विक्री करताना बेपारी आढळून आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

संशयित बेपारीने गुरांचे रक्षण करणाऱ्या आणि प्राण्यांवरील क्रूरता रोखणाऱ्या राज्य कायद्यांचे उल्लंघन केले, असे पोलिसांनी सांगितले.

मलिकजान बेपारी विरोधात बीएनएसच्या कलम ३२५, गोवा, दमण आणि दीव गोहत्या प्रतिबंधक कायदा कलम ३, ५ आणि ८ यासह प्राण्यांवर क्रूरता कायदा आणि गोवा प्राणी संरक्षण कलम 4, 5, 8 आणि 10 अंतर्गत मायणा कुडतरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला मडगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT