पणजी: ‘ओंकार’ या रानटी हत्तीला पकडून गडचिरोलीत पाठवण्यासाठी कर्नाटकने चार प्रशिक्षित हत्ती आणि माहूत पाठवण्याची तयारी दर्शविली आहे. गोव्याने तूर्त दोन प्रशिक्षित हत्ती आणि माहूत पाठवण्याची विनंती केली आहे.
राज्याचे प्रमुख वन्यजीव संरक्षक रमेश कुमार यांच्या म्हणण्यानुसार, ओंकार हत्ती पेडणे तालुक्यात उगवेपर्यंत आला आहे. लोक सहकार्य करत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. त्याला पकडून गडचिरोलीत पाठवण्यासाठी कर्नाटकने पथक पाठवण्याची तयारी दर्शविली आहे. दसरोत्सवाच्या दरम्यान हे पथक गोव्यात दाखल होऊ शकते.
महाराष्ट्राच्या तिळारी भागातील हत्ती कर्नाटकने न्यावेत, अशी महाराष्ट्राची कर्नाटककडे असलेली मागणी हा स्वतंत्र विषय असल्याचे गोवा वन खात्याचे म्हणणे आहे. कर्नाटकातील हत्ती गोव्यात आले होते, त्यावेळी त्यांना राज्याबाहेर हुसकावले होते, याचीही आठवण यानिमित्ताने काढली जात आहे.
दरम्यान, कर्नाटकातील दसरोत्सवाच्या निमित्ताने प्रशिक्षित हत्ती आणि माहूत म्हैसूर येथील राज्य महोत्सवात व्यस्त असणार, असे गृहित धरून दसरोत्सवानंतर गोव्यातील मोहिमेसाठी हत्ती आणि माहूत उपलब्ध करण्यात येतील, असे कळविण्यात आले होते. मात्र, आता चार हत्ती उपलब्ध असल्याने त्यांना गोव्यात पाठवता येईल, असे कळविले आहे. त्यानंतर दोन हत्ती आणि माहूत पाठवल्यास १०-१२ वर्षे वयाचा ओंकार हत्ती पकडता येईल, असे गोव्याकडून कळविण्यात आले आहे.
१ कर्नाटकातील प्रशिक्षित हत्ती ट्रकमधून गोव्यात आणले जातील.
२ सोबत माहूत आणि कर्नाटक वन खात्याचे कर्मचारी असतील.
३ ओंकारला गुंगीचे इंजेक्शन दिले जाईल.
४ त्यानंतर तो सैरावैरा पळू नये, यासाठी प्रशिक्षित हत्तींची गरज असते. ते त्याला दोन्ही बाजूने अडवतील.
५ त्यानंतर त्याला महाराष्ट्राच्या गडचिरोली येथील हत्ती तळावर पाठवण्यात येईल, असे रमेश कुमार यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.