Omkar Elephant: ‘ओंकार हत्ती’ पोचला उगवे गावात! शेतकरी भयभीत; पाहायला होते आहे तुफान गर्दी

Goa Elephant News: तांबोसे गावातील शेतकऱ्यांची कवाथे, भातशेती, केळींची नासधूस केल्यानंतर आता उगवे गावातील भात शेतीकडे ओंकारने मोर्चा वळविला आहे. त्यामुळे येथील शेतकरी भयभीत झाले आहेत.
Elephant Omkar Goa
Elephant Omkar GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: तब्बल सात दिवसांनंतर ओंकार हत्तीने आज तांबोसे गावातून शेजारच्या उगवे गावात प्रवेश केला. तांबोसे गावातील शेतकऱ्यांची कवाथे, भातशेती, केळींची नासधूस केल्यानंतर आता उगवे गावातील भात शेतीकडे ओंकारने मोर्चा वळविला आहे. त्यामुळे येथील शेतकरी भयभीत झाले आहेत.

उगवे गावात प्रवेश केल्यानंतर गावकऱ्यांनी याची माहिती शेतकऱ्यांना दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरक्षितपणे शेतामधून घराकडे प्रयाण केले. वन खात्याचे कर्मचारी हातात गंडेल घेऊन शेताच्या बाजूला उभे राहून हत्तीवर नजर ठेवून आहेत.

ओंकार हत्तीने गेले सात दिवस तांबोसे गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची अद्याप भेटही घेतलेली नाही. शेतात, बागायतीत किती नुकसान झाले, त्याचा अंदाजही अजून कृषी विभागाने घेतलेला नाही.

याविषयी सरपंच सुबोध महाले म्हणाले, की ओंकार हत्ती मागील सात दिवसांपासून तांबोसे गावात होता. आज तो उगवे परिसरात आला आहे. कृषी विभागाने तांबोसे गावात हत्ती असताना किती नुकसान झाले, त्याची पाहणी केलेली नाही. मात्र, मी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. या हत्तीचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच सुबोध महाले यांनी केली आहे. सध्या वन खात्याचे कर्मचारी ओंकार हत्तीवर पाळत ठेवून आहेत.

शेतीची नासाडी रोखा!

वनमंत्री विश्वजीत राणे यांनी, दसरोत्सवानंतर तज्ज्ञ हत्तीस्वारांना पाचारण करून ओंकारचा बंदोबस्त केला जाईल, असे सांगितले आहे. परंतु तोपर्यंत ओंकार हत्तीने शेताची मोठ्या प्रमाणात नासाडी करावी काय, असा सवाल काँग्रेसचे नेते ॲड. जितेंद्र गावकर यांनी उपस्थित केला आहे. या हत्तीचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांसह ॲड. गावकर, शेतकरी उदय महाले, शशिकांत महाले, सरपंच सुबोध महाले यांनी केली आहे.

Elephant Omkar Goa
Omkar Elephant: गोव्यात ‘ओंकार’ हत्तीचा मुक्काम वाढला! दसऱ्यानंतरच होणार सीमोल्लंघन; म्‍हैसूरमधील उत्सवानंतर येणार पथक

महाराष्ट्रातून तज्ज्ञ येणार गोव्यात

ओंकार हत्तीला पकडण्यासाठी महाराष्ट्रातील तज्ज्ञांची एक टीम गोव्यात येत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, तज्ज्ञ हत्तीस्वार हत्तींसोबत ओंकारला पकडण्यासाठी येत नाहीत, तोपर्यंत ओंकार हाती लागणे कठीण आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Elephant Omkar Goa
Omkar Elephant: 'ओंकार हत्ती'ने लावले कामाला, तांबोसेत गवत काढण्याचे काम सुरू; नजर ठेवण्यासाठी घेतला निर्णय

हत्ती पाहण्यासाठी गर्दी

तांबोसे गावातून तेरेखोल नदीच्या बाजूने शेतांमधून उगवेत येताना त्याला पाहण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर लोकांनी मोठी गर्दी केली होती. तब्बल सहा दिवसांनी ओंकार हत्ती तांबोसे गावातील शेतांमधून बाहेर पडल्याने तांबोसेवासीयांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com