Elephant In Goa
Omkar ElephantDainik Gomantak

Omkar Elephant: गोव्यात ‘ओंकार’ हत्तीचा मुक्काम वाढला! दसऱ्यानंतरच होणार सीमोल्लंघन; म्‍हैसूरमधील उत्सवानंतर येणार पथक

Elephant In Goa: वन खात्यातून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक सरकारने या वर्षीच्या सुरवातीला सहा प्रशिक्षित हत्ती व माहूत आंध्र प्रदेशातील हत्तींची समस्या सोडवण्यासाठी पाठवले होते.
Published on

पणजी: पेडण्यात शिरलेला रानटी हत्ती ‘ओंकार’ याला पकडून सुरक्षितस्‍थळी नेण्यासाठी आता दसऱ्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कर्नाटक वन खाते सध्या म्‍हैसूर दसरोत्‍सवाच्‍या तयारीत गुंतलेले आहे.

दसऱ्यानंतरच प्रशिक्षित हत्तींचे (कुमकी) पथक आणि माहूत गोव्याकडे पाठवले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वन खात्यातून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक सरकारने या वर्षीच्या सुरवातीला सहा प्रशिक्षित हत्ती व माहूत आंध्र प्रदेशातील हत्तींची समस्या सोडवण्यासाठी पाठवले होते.

Elephant In Goa
Omkar Elephant: 'ओंकार हत्ती'ने लावले कामाला, तांबोसेत गवत काढण्याचे काम सुरू; नजर ठेवण्यासाठी घेतला निर्णय

ते हत्ती आता कर्नाटकमध्ये परत आले आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्रातील तिळारी परिसरात असलेले पाच हत्ती पकडून त्यांना परत नेण्यासाठीही कर्नाटक प्रयत्नशील आहे. याचदरम्यान आपल्या कळपापासून दूर गेलेला ‘ओंकार’ नावाचा हत्ती गोव्यात पोहोचला आहे.

Elephant In Goa
Omkar Elephant: "ओंकारला वनतारात पाठवणार नाही", हत्तीच्या स्थलांतरावरून वनमंत्री राणेंची स्पष्ट भूमिका

दसरा उत्सव हा म्‍हैसूरमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा होत असल्याने, त्यासाठी प्रशिक्षित हत्तींचा मोठा वापर होतो. त्यामुळे गोव्यातील मोहिमेला तो उत्सव संपल्यानंतरच गती मिळेल, असे कर्नाटकने कळविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com