Omkar Elephant Dainik Gomantak
गोवा

Omkar Elephant: गोवा-महाराष्‍ट्राकडून ओंकार हत्तीचा ‘फुटबॉल’! वन कर्मचाऱ्यांचा सीमेवर पहारा; सुरक्षितस्‍थळी सोडण्याची गरज

Elephant In Goa: ओंकारचा गोवा आणि महाराष्‍ट्रात पुरता फुटबॉल झाला आहे. महाराष्‍ट्रातील ओंकार हत्ती कळपापासून विभक्त झाल्‍यानंतर गोव्‍यात दाखल झाला. पेडणेतील काहीजणांच्‍या शेतीचीही त्‍याने नासधूस केली.

Sameer Panditrao

पणजी: मूळ कळपापासून विभक्त होऊन गोवा-महाराष्‍ट्रातील सीमा भागात हेलपाटे मारणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीला गोव्‍यातून महाराष्‍ट्रात घालविण्‍यासाठी गोवा वन खात्‍याकडून जोरदार प्रयत्‍न सुरू असतानाच, महाराष्‍ट्र वन खात्‍याचे सुमारे दहा कर्मचारी ‘ओंकार’ने महाराष्‍ट्रात प्रवेश करू नये, यासाठी सीमेवर मुक्‍काम ठोकून पहारा देत आहेत.

त्‍यामुळे ओंकारचा गोवा आणि महाराष्‍ट्रात पुरता फुटबॉल झाला आहे. महाराष्‍ट्रातील ओंकार हत्ती कळपापासून विभक्त झाल्‍यानंतर गोव्‍यात दाखल झाला. पेडणे परिसरातील काहीजणांच्‍या शेतीचीही त्‍याने नासधूस केली.

त्‍यामुळे गोवा वन खात्‍याने या हत्तीला महाराष्‍ट्रातील दोडामार्ग भागामध्‍ये परतवण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू केले; परंतु या हत्तीने गेले काही दिवस गोव्‍यातून दोडामार्ग आणि दोडामार्गमधून गोवा असा प्रवास सुरू ठेवला.

गेल्‍या तीन-चार दिवसांपासून त्‍याने तांबोसे येथे मुक्काम ठोकला असल्‍याची माहिती सरकारी सूत्रांनी गुरुवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली. महाराष्‍ट्र वन खात्‍याचे सुमारे दहा कर्मचारी सीमेवर पहारा देत आहेत, असेही सूत्रांनी सांगितले.

ओंकार हत्तीबाबत वनमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी माझ्याशी चर्चा केली आहे. गोव्‍याच्‍या हद्दीत आलेल्‍या हत्तीला महाराष्‍ट्र वन खात्‍याच्‍या मदतीने सुरक्षितस्‍थळी नेऊन सोडण्‍याचे निर्देश वन खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांना देण्‍यात आले आहेत.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Supply Shortage: 24 तास पाण्याचं आश्वासन हवेत विरलं! सासष्टी तालुक्यात तक्रारींचा पाऊस, नागरिक पाण्यासाठी व्याकूळ

रणवीरची अ‍ॅक्शन अन् मोदींचा स्वॅग! 'धुरंधर 2' मधील पंतप्रधानांच्या एन्ट्रीवर चित्रपटगृहात जल्लोष अन् टाळ्यांचा कडकडाट VIDEO

Viral Video: 'हे इराण-इस्रायल युद्ध नाही तर...', पंजाबी फॅमिलीचा फूल टू ड्रामा, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; काय घडलं नेमकं?

Goa Drug Case: मोठा गाजावाजा, पण पुरावा शून्य! 43 कोटींचे ड्रग्ज रॅकेट हवेत विरले; पुराव्याअभावी वास्कोतील वाडेकर दांपत्यासह चौघांची निर्दोष मुक्तता

Bicholim Crime: डिचोलीतील 'त्या' अमानुष हत्यांनी हादरला 'गोवा'! 10 महिन्यात 4 निर्दयी खून; दोन चिमुकले आणि दोन महिलांचे बळी

SCROLL FOR NEXT