Omkar Elephant: 'ओंकार हत्ती' गोव्याच्या महामार्गावर! वाहतूक ठप्प; तोर्सेत पाडला बांबूचा फडशा

Omkar Elephant Goa: ओंकार हत्तीला महाराष्ट्रात हद्दीत सोडल्याने सुटकेचा सुस्कारा सोडला असतानाच रात्री सिंधुदुर्गातील डिंगणेमार्गे कुमयाचो व्हाळ-तोर्से या गोव्याच्या हद्दीत पोहोचला.
Omkar elephant Goa
Omkar elephant GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे : मोपा परिसरात आलेल्या ओंकार हत्तीला महाराष्ट्रात हद्दीत सोडल्याने वन कर्मचारी व स्थानिक लोकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला असतानाच काल रात्री सिंधुदुर्गातील डिंगणेमार्गे कुमयाचो व्हाळ-तोर्से या गोव्याच्या हद्दीत पोहोचला.

नंतर रात्री या हत्तीने फकिरपाटो येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या इमारतीजवळील बागायतीत काही केळीची झाडे मोडून टाकली. नंतर रात्रीत हत्तीने मोर्चा धुजगी येथे वळवला. सकाळपर्यंत हा हत्ती येथील पेट्रोलपंपमागील झाडीत होता.

वनाधिकारी व कर्मचारी या हत्तीवर पाळत ठेवून होते. झाडांची बेसुमार कत्तल, डोंगर सपाटीकरण यामुळे हत्ती गावात येत आहेत. लोकवस्तीत येऊ लागले आहेत, असे सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी सांगितले.

Omkar elephant Goa
Omkar Elephant: 'रात्री घराबाहेर पडू नका, शांतता राखा'! ओंकार हत्ती घुटमळतोय गोवा हद्दीत; कळपातील सदस्य कोल्हापूर जिल्ह्यात

काहीकाळ वाहतूक ठप्प

हत्तीला बघण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर वाहने थांबविल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली तर कडशी मोपा व धनगरवाडी या वस्तीवर जाणारी वाहतूकही बंद पडली.

Omkar elephant Goa
'ओंकार' परतून गोंयात आयलो रे..! फकीर पाटो येथे केळीच्या बागेचे केले नुकसान; कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी

तोर्सेत आढळला ‘ओंकार’

हा हत्ती काल संध्याकाळी चारनंतर तोर्से भागातून तो दोन दिवस मोपात जिथे वास्तव्याला होता, तिथे जाण्याच्या प्रयत्नात होता. पण तिळारीचा कालवा मध्ये आल्याने त्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. नंतर तो राजलवाडा तोर्से भागात होता. तिथे त्याने बांबूचा फडशा पाडला. रात्री ८ च्या सुमारास तो रानाकडे गेला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com