Omkar Elephant Update Dainik Gomantak
गोवा

Omkar Elephant: 'ओंकार हत्ती'ने लावले कामाला, तांबोसेत गवत काढण्याचे काम सुरू; नजर ठेवण्यासाठी घेतला निर्णय

Elephant In Goa: गोव्यात आलेल्या रानटी हत्ती ‘ओंकार’च्या सुरक्षित स्थलांतरासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तिन्ही राज्य सरकारांमध्ये समन्वय सुरू आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोव्यात आलेल्या रानटी हत्ती ‘ओंकार’च्या सुरक्षित स्थलांतरासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तिन्ही राज्य सरकारांमध्ये समन्वय सुरू आहे. वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने प्रयत्न सुरू असून शेतकऱ्यांची झालेली पिकांची हानी लक्षात घेता त्यांना नुकसानभरपाईही देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, हत्ती ‘ओंकार’ गेल्या काही दिवसांपासून शेतांमध्ये फिरत असून, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारला याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य त्या पद्धतीने नुकसानभरपाई देण्यात येईल. तसेच, या हत्तीला त्रास न देता त्याचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

वन खात्याच्या पथकांनी आधीच संबंधित भागात पाहणी करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. तज्ज्ञांची मदत घेत हत्तीला कोणत्याही इजा न पोहोचवता त्याचे जंगलात पुनर्वसन करण्याची तयारी करण्यात येत आहे. तीनही राज्यांमध्ये समन्वय साधून ‘ओंकार’ला त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत पाठवले जाईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.

गवत काढण्याचे काम सुरू

तांबोसे येथे दाखल झालेला ओंकार हत्ती मळ्यात कुठे लपून बसतो, हे सहज लक्षात येत नाही. मळ्यात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे. ते गवत कापण्यासाठी वन खाते व कृषी खात्यामार्फत काम सुरू आहे. गवत हटवल्यानंतर या हत्तीवर नजर ठेवण्यास तसेच पुढील कारवाई हाती घेणे सोपे होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT