OMG Tourists in Goa do not follow Corona protocol

 

Dainik Gomantak

गोवा

ओमिक्रॉन चा धोका असताना गोव्यात पर्यटकांचा बेफिकीरपणा!

सुट्टी साजरी करायला गोव्याल जायचं मग नियम का पाळायचे?

दैनिक गोमन्तक

ओमिक्रॉन संसर्गाचा (Omicron Variant) धोका असूनही गोव्यात पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. चिंतेची बाब म्हणजे पर्यटक अजिबात कोरोना प्रोटोकॉलचे पालन करत नाहीत. लोकांना वाटतं की ते पार्टीच्या मूडमध्ये आहेत, सुट्टी साजरी करायला गोव्याल आले आहेत, मग नियम का पाळायचे? पण कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही हे गोव्यात येणारे पर्यटक पुर्णपणे विसरत आहेत. बर्‍याच काळानंतर, गोव्याच्या पर्यटन उद्योगासाठी ही चांगली गोष्ट आहे की, राज्यात पर्यटक वाढत आहेत. म्हणजे गोव्याचे जुने आकर्षण परत येत आहे, बुकिंग वाढत आहे.

या व्यावसायिकांना गोवा सरकारकडून (Goa Government) कोणतीही मार्गदर्शक सूचना देण्यात आली नसल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मतानुसार गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी (Tourist) कोरोना प्रोटोकॉलचे (Covid-19 protocol) पालन न करणे भविष्यात खूप जड जाऊ शकते. यामुळे कोरोना रूग्णसंख्येत वाढ होवू शकते.

गोव्यात काल कोरोनाची 43 नवीन प्रकरणे आढळून आली आहेत आणि तीन जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 36 बरे होवून घरी गेले आहेत. काल बुधवारी सक्रिय प्रकरणांची एकूण संख्या 392 वर पोहचली आहे. काल दिवसभरात 2441 चाचण्या करण्यात आल्या त्यात कोरोना पॉझिटिव्ह दर 1.7% होता, तर रिकव्हरीरेट दर 97.8% होता.

मडगाव शहरी आरोग्य केंद्राची संख्या वाढून 54 वर पोहोचली आहे, तर उत्तर गोव्यातील दुसरे आरोग्य केंद्रामध्ये कोरोना रूग्णसंख्या 30 पेक्षा कमी होती. दक्षिण गोव्यात, मडगाव शहरी भागात किरकोळ घसरण झाली असून काल 46 प्रकरणांची नोंद झाली आहे. इतर सर्व केंद्रांची रूग्णसंख्या 20 पेक्षा कमी राहिली आहे. गोव्यातील सहा केंद्रांवर प्रत्येकी दहापेक्षा कमी रूग्णसंख्या होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

Drug Bust Case: गोव्यात सात दिवस पाळत, मग ठोकल्या बेड्या! तेलंगण पोलिसांची अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई; एलएसडीसह चरसही जप्त

Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

SCROLL FOR NEXT