डिचोलीत साप्ताहिक बाजारात मासळी विक्रेत्यांमध्ये वाद, लमाणीना मज्जाव

परप्रांतीय मासळी विक्रेत्यांना बाजारात बसण्यास स्थानिक महिला विक्रेत्यांनी विरोध केला. नंतर पालिकेच्या मार्केट निरीक्षकांनी वादास कारणीभूत ठरलेल्या विक्रेत्यांना बाजारातून हुसकावले
Bicholim fish market

Bicholim fish market

Dainik gomantak

Published on
Updated on

डिचोली : डिचोलीत गेल्या साप्ताहिक बाजारात लमाणी भावांमध्ये मारहाणीचा प्रकार ताजा असतानाच, आजही (ता.22) साप्ताहिक बाजारात सुकी मासळी विक्रेत्यांमध्ये वाद निर्माण झाला. त्यामुळे काहीवेळ बाजारातील वातावरण काहीसे तापले. यासंबंधीची माहिती अशी की, साप्ताहिक बाजाराच्या दिवशी नवीन बाजार संकुलाजवळ बसणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यांनी क्षुल्लक कारणावरून सुकी मासळी विकणाऱ्या स्थानिक महिला विक्रेतेशी हुज्जत घातली.

<div class="paragraphs"><p>Bicholim fish market</p></div>
'एमआरएफ' शेडला कारापूरवासियांचा विरोध; उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

विक्रेत्या महिलेच्या मुलाची नरडीही पकडल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकारानंतर बाजारातील वातावरण काहीसे तापले. परप्रांतीय मासळी (Fish) विक्रेत्यांना बाजारात बसण्यास स्थानिक महिला विक्रेत्यांनी विरोध केला. नंतर पालिकेच्या मार्केट (Market) निरीक्षकांनी वादास कारणीभूत ठरलेल्या विक्रेत्यांना बाजारातून हुसकावले. दरम्यान, सकाळी बाजारातून हुसकावल्यानंतर सुकी मासळी विकणाऱ्या त्या परप्रांतीय विक्रेत्यांनी सायंकाळी पुन्हा बाजारात मासळी विक्री सुरु केली.

लमाणीना प्रतिबंध

गेल्या आठवड्यात बाजारात हाणामारी करणाऱ्या त्या दोघांही भाजी विक्रेत्या भावांना आज बाजारात बसण्यास पालिकेने मनाई केली. नेहमीप्रमाणे हे लमाणी भाजीविक्रेते बाजारात भाजी विक्री करण्यासाठी आले असता, पालिका (Municipality) अधिकाऱ्यांनी त्यांना व्यवसाय करण्यास प्रतिबंध केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

cricket betting racket in Goa
MGP political controversy
EV charging stations in Goa
Goa fishing trawler on hydrogen fuel
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com