Olive Ridley  dainikgomantak
गोवा

Olive Ridley Nesting: 'गालजीबाग'कडे सागरी कासवांनी फिरवली पाठ? आगोंद येथे 172 अंड्यांची नोंद

Sea Turtle Eggs: काणकोणात संपूर्ण गालजीबाग किनारा व आगोंद किनाऱ्याचा काही भाग हा सागरी कासवांसाठी आरक्षित आहे.

Sameer Panditrao

Olive Ridley Eggs in Goa

काणकोण: आगोंद किनाऱ्यावर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दोन ऑलिव्ह रिडले कासवांनी १७२ अंडी घातली. मात्र, अद्याप गालजीबाग किनाऱ्यावर सागरी कासवाचे आगमन झालेले नाही.

काणकोणात संपूर्ण गालजीबाग किनारा व आगोंद किनाऱ्याचा काही भाग हा सागरी कासवांसाठी आरक्षित आहे. आगोंद किनारा पर्यटन व्यवसायाने गजबजलेला असूनही या किनाऱ्यावर सर्वाधिक सागरी कासवांचे आगमन होते. २८ डिसेंबरला पहिल्यांदा ऑलिव्ह रिडले कासवाचे आगमन होऊन त्याने ६५ अंडी घातली. २९ डिसेंबरला दुसऱ्या सागरी कासवाचे आगमन झाले. त्याने १६५ अंडी घातली. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापासून सागरी कासवांचे आगमन अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर होते. ते काही वेळा हे महिन्यापर्यंत सुरू असते.

गालजीबाग येथे ४३ सागरी कासवांनी ४,१९२ अंडी घातली होती. त्यापैकी ३,३५१ अंड्यांमधून पिल्ले बाहेर आली, तर ४४८ अंडी नासली. २१९ पिल्ले मृत पावली. आगोंद किनाऱ्यावर १८१ सागरी कासवांनी १७,४०६ अंडी घातली होती. त्यापैकी ९,४७३ अंड्यांतून पिल्ले बाहेर आली. ६,५४० अंड्यांतून पिल्ले बाहेर आलीच नाहीत. ९१३ पिल्ले मरण पावली.

शिवाय अन्यत्र ७ सागरी कासवांनी ५८५ अंडी घातली. त्यापैकी ४२९ अंड्यांतून पिल्ले बाहेर आली. ११८ अंडी नासली, तर ३८ पिल्लांना समुद्रात सोडण्यापूर्वीच मरण आले. राज्यात मोरजी, आगोंद आणि गालजीबाग येथे सागरी कासव संवर्धन केंद्रे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; तरीही केजरीवालांचे ‘एकला चलो’ का?

Goa: RSSच्या विजयादशमीला मोन्‍सेरात उपस्‍थित! 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केले अभिनंदन; उत्पल पर्रीकरांची गणवेशात उपस्‍थिती

Bhuipal: रात्री येत होता घरी, जबरदस्ती गाडीत बसवण्याचा केला प्रयत्न; 12 वर्षीय मुलाच्या प्रसंगावधानामुळे अपहरणाचा डाव फसला

Water Supply Revenue: पाणी गळती, नादुरुस्त मीटर्स! सरकारला 5 कोटींचा फटका; नासाडी थांबवण्यासाठी एजन्सीची नेमणूक

Aldona: संतापजनक! हळदोण्यात पाळीव कुत्र्याच्या जबड्यावर झाडली गोळी; स्थानिकांची कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT