Crime News Dainik Gomantak
गोवा

Crime News: जुने गोव्यात तरुणाचा खून; मृतदेह सावंतवाडीत आणून टाकला! शोरमा सेंटरच्या वादातून धक्कादायक घटना

Old Goa Youth Murder Case: खिशातील ओळखपत्र व मोबाईलच्या आधारे तपास केल्यानंतर आझीम हा गोव्यातील एका शोरमा सेंटरमध्ये काम करत असल्याचे समोर आले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी/सावंतवाडी: सावंतवाडी रोड रेल्वेस्थानकाजवळील निरवडे-नमसवाडी येथे आढळलेल्या २३ वर्षीय आझीम खान (रा. उत्तर प्रदेश) या युवकाचा जुने गोवे येथे खून करून मृतदेह महाराष्ट्रात आणून टाकल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी जुने गोवे येथून दोन संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता. ६) सायंकाळी रस्त्याच्या कडेला आझीमचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून तो ताब्यात घेतला. खिशातील ओळखपत्र व मोबाईलच्या आधारे तपास केल्यानंतर आझीम हा गोव्यातील एका शोरमा सेंटरमध्ये काम करत असल्याचे समोर आले.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आझीम आणि सेंटरच्या मालकाचा मेहुणा स्वतंत्र शोरमा व्यवसाय सुरू करण्याच्या प्रयत्नात होते. यावरून मालकाशी त्याचा वाद झाला. शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर मारामारीत झाले. त्यात आझीम गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह चारचाकीतून निरवडे येथे आणून टाकल्याचे तपासात समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nana Patekar Death: हातात बॅट-बॉल अन् दादरचं शिवाजी पार्क... सुनील गावस्करांसोबत खेळणारे 'नाना' क्रिकेटपासून दूर का गेले? वाचा खास किस्सा

Nana Patekar Famous Dialogues: 'एक मच्छर...' पासून 'कंट्रोल उदय कंट्रोल'पर्यंत! नाना पाटेकरांचा दमदार आवाज अन् जबरदस्त डॉयलॉग VIDEO

Nana Patekar Kargil War Story: दुष्मनांसमोर छाती ठोकपणे उभे राहिले, संरक्षण मंत्र्यांकडून घेतली होती विशेष परवानगी; नाना पाटेकरांच्या आयुष्यातील 'तो' थरारक प्रसंग

Accident Death: दिवसभर कष्ट, फुटपाथवर विसावा अन् पहाटे काळाचा घाला; पणजीत कारच्या धडकेत मजुराचा दुर्दैवी मृत्यू

Sanjivani Sugar Factory: 'संजीवनी'चा कारभार मिरजमधील 'क्रेडो इम्‍पेक्‍स'कडे, येत्‍या हंगामात कारखाना सुरू; ऊस गाळपासह इथेनॉलचीही होणार निर्मिती

SCROLL FOR NEXT