Old Goa Church  Dainik Gomantak
गोवा

Old Goa Church: ओल्ड गोव्याची चर्च 18 सप्टेंबर रोजी पर्यटकांसाठी बंद!!

Old Goa Church Close: उद्या सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत चर्च बंद

गोमन्तक डिजिटल टीम

Old,Goa

ओल्ड गोवा: गोव्यातील सुप्रसिद्ध चर्च म्हणजे जुने गोवे किंवा ओल्ड गोवा येथील बॅसिलिका ऑफ बॉम जिझस (Old Goa Church). गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी ही चर्च नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते, तर भाविकांसाठी ओल्ड गोव्याची चर्च श्रद्धास्थान आहे.

चर्चच्या बाहेर नेहमीच प्रचंड रंग पाहायला मिळते मात्र उद्या दि. 18 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत चर्च बंद असणार आहे. धार्मिक सेवेच्या निमित्ताने चर्च बंद असल्याने पर्यटक चर्चमध्ये प्रवेश करू शकणार नाहीत.

उद्या सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी 7 वाजता कोंकणीमधून आणि सकाळी 8 वाजता इंग्रजीमधून मास होईल.

बॅसिलिका ऑफ बॉम जीझसच्या चर्चमध्ये उद्या सकाळी 10 वाजता आर्चबिशप फिलिप नेरी कार्डिनल फेर्राव यांच्याकडून तीन जेसुइट डिकन्सना (Deacons) पुरोहित पद (Priestly Ordination) प्रदान केले जाईल.

या समारंभासाठी काही आमंत्रित मंडळींचाच प्रवेश ग्राह्य धरला जाईल अशी माहिती फादर पॅट्रिसिओ फर्नांडिस यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: हणजूण ग्रामसभा तापली; संगीत महोत्सवावरुन दोन गटात मारहाण

Goa Cabinet: ‘वाचाळवीर’ स्कॅनरखाली! चार मंत्र्यांना वगळून नव्यांना संधी द्या; मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण

Goa Tourism: पर्यटनाच्या नव्या संधी उपलब्ध होणार; गोवा-उझबेकिस्तान संबंधांना मिळणार नवा आयाम!

Benaulim: बाणावलीची जागा काँग्रेसच लढणार; निंबाळकरांनी विधानसभा निवडणुकीबाबत केले मोठे विधान

Goa Crime: वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील चौथा आरोपी अटकेत; गोवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT