'गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्‍येने गोव्‍यात यावे'; गुजरातमधील परिषदेत मुख्‍यमंत्री सावंतांचे आवाहन

4th Global RE Invest 2024: २०५० पर्यंत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्‍य करण्‍याचे उदिष्‍ट्य आणि ते पूर्ण करण्‍यासाठी आवश्‍‍यक ते प्रयत्‍न करणार; डॉ. प्रमोद सावंत
4th Global RE Invest 2024: २०५० पर्यंत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्‍य करण्‍याचे उदिष्‍ट्य आणि ते पूर्ण करण्‍यासाठी आवश्‍‍यक ते प्रयत्‍न करणार; डॉ. प्रमोद सावंत
PM Natendra Modi|CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Renewable Energy Investors Meet & Expo

गांधीनगर: गोव्‍यात गुंतवणुकीच्‍या अनेक संधी उपलब्‍ध आहेत. त्‍यामुळे देशी-विदेशी गुंतवणुकदारांचे गोव्‍यात स्‍वागतच आहेत. त्‍यांना आवश्‍‍यक त्‍या सर्व सोयीसुविधा दिल्‍या जातील, असे प्रतिपादन मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. गुजरात येथील गांधीनगरमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय नवीनीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूकदारांसाठीच्‍या परिषदेला (RE Invest 2024) ते संबोधित करत होते.

अक्षय ऊर्जेला चालना देताना २०५० पर्यंत कार्बन उत्सर्जनाचे (Carbon Emission) प्रमाण शून्‍य करण्‍याचे उदिष्‍ट्य गोव्‍याने ठेवले आहे आणि ते पूर्ण करण्‍यासाठी सरकार आवश्‍‍यक ते सर्व प्रयत्‍न करणार आहे, असे मुख्‍यमंत्री सावंत म्‍हणाले. प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्‍यामुळे अनेक समस्‍या निर्माण होऊ लागल्‍या आहेत. त्‍यावर उपाययोजना करणे आता काळाची गरज बनली आहे. म्‍हणूनच अक्षय ऊर्जेला प्राधान्‍य द्या, असे आवाहन मुख्‍यमंत्र्यांनी केले.

या परिषदेत बोलताना मुख्‍यमंत्री सावंत यांनी देशी-विदेशी गुंतवणूकदारांना गोव्‍यात येण्‍याची साद घातली. ते म्‍हणाले, ‘एक खिडकी’ तसेच अन्‍य आवश्‍‍यक सुविधा गुंतवणूकदारांना उपलब्‍ध करून देण्‍यात येतील. तसेच त्‍यांच्‍यासाठी आवश्‍‍यक ते सोयी, सवलती दिल्‍या जातील. त्‍यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्‍येने गोव्‍यात यावे. आम्‍ही तुमचे स्‍वागतच करू.

अध्याय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल; पंतप्रधान

भारत देश वैविध्य, क्षमता, विस्तार, क्षमता व कामगिरी या सर्वच क्षेत्रांत अद्वितीय असून २१व्या शतकात सर्वांत अग्रेसर असल्याचे सर्व जग मानत आहे. त्यामुळे जेव्हा २१ व्या शतकाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा सौरऊर्जा क्षेत्रातील भारताच्या योगदानाचा अध्याय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या परिषदेत केले. ते म्‍हणाले, २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्यासाठी भारताला मोठ्या प्रमाणात ऊर्जेची गरज आहे. मात्र, आपल्याकडे तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे साठे नसल्याने भारत ऊर्जेची गरज भागविण्यासाठी सौरऊर्जा, पवनऊर्जा, आण्विक आणि जलऊर्जेवर भर देत आहे.

देशी-विदेशी गुंतवणूकदारांना गोव्‍यात अनेक संधी उपलब्‍ध आहेत. त्‍यांना आवश्‍‍यक त्‍या सर्व सोयीसुविधा माझे सरकार देईल. त्‍यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्‍येने गोव्‍यात यावे.

डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com