Basilica of Bom Jesus Church:
Basilica of Bom Jesus Church:Dainik Gomantak

Old Goa Church: ओल्ड गोव्यातील बॅसिलिका ऑफ बॉम जिझस चर्च 'या' दिवशी पर्यटकांसाठी राहणार बंद

विविध धार्मिक कार्यांचे आयोजन
Published on

Basilica of Bom Jesus Church: ओल्ड गोवा येथील बॅसिलिका ऑफ बॉम जिझस हे चर्च गुरुवारी (6 एप्रिल) सकाळपासून रविवारी (9 एप्रिल) सकाळी 11 वाजेपर्यंत पर्यटक आणि इतर अभ्यागतांसाठी बंद राहील.

या काळात गुडफ्रायडे असणार आहे. त्यामुळे हा सप्ताह पवित्र मानला जातो. याकाळात विविध धार्मिक विधी केले जाणार आहेत. त्याकरिता हे चर्च पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. ओल्ड गोव्यातील हे चर्च प्रसिद्ध आहे. देशभरातील पर्यटक या चर्चला भेट देत असतात.

Basilica of Bom Jesus Church:
Margao Woman Assaulted: मडगावात 3 गुंडांची महिलेला जबर मारहाण; हात-पाय मोडला...

बॅसिलिका ऑफ बॉम जीसस चर्चचे फादर पॅट्रिसिओ फर्नांडिस म्हणाले की, या पवित्र काळात कॅथलिक समुदायासाठी धार्मिक सेवांचे आयोजन केले जाईल.

मौंडी गुरुवारी (लॉर्ड्स सपर), धार्मिक सेवा संध्याकाळी 5.30 वाजता सुरू होतील. गुड फ्रायडेदिवशी (पॅशन ऑफ लॉर्ड) दुपारी ३.०० वाजता धार्मिक सेवा सुरू होतील. याशिवाय प्रार्थना, ज्यामध्ये वे ऑफ द क्रॉस (सकाळी 10), थ्री अवर अगोनी (दुपारी 12) आणि डीव्हाईन मर्सी नोव्हेना यांचा समावेश आहे.

शनिवारी, devotion Mater Dolorosa सकाळी 10 वाजता आयोजित केली जाईल. इस्टर व्हिजिल सेवा रात्री 11.30 वाजता आयोजित केली जाईल. इस्टर रविवारी, सकाळी 7 आणि सकाळी 8 वाजता (कोंकणी), सकाळी 9.15 आणि दुपारी 12 वाजता (इंग्रजी) प्रार्थना केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com