Comunidades of Goa building Dainik Gomantak
गोवा

Goa Comunidade: मडगाव कोमुनिदादमधील 'त्या' कागदपत्रांना धोका

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव येथील दक्षिण गोवा कोमुनिदादची जुनी इमारत मोडकळीस आल्याने कोमुनिदाद कचेरी जुन्या मामलेदार कचेरी इमारतीत स्थलांतरित करण्यात आली आहे. मात्र, जुन्या इमारतीतील कागदपत्रे या नव्या कचेरीत आणण्यात आलेली नाहीत.

गेल्या काही दिवसांपासून जोरात पाऊस पडत असल्याने व पाणी कचेरीत येत असल्याने तेथील कागदपत्रे, दस्तऐवजाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोमुनिदाद कचेरीतील एकही अधिकारी जुन्या कचेरीत गेला नसून त्यामुळे तेथील कागदपत्रांची, दस्तऐवजांची नेमकी काय परिस्थिती आहे याची कोणालाच माहिती नाही.

दरम्यान, विद्यमान दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासक स्वत:च गैरहजर राहत असल्याने कित्येक कामे प्रलंबित आहेत. सरकारने विद्यमान प्रशासकाला निलंबित केल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत जाहीर करून नव्या प्रशासकाची नियुक्ती केल्याचे जाहीर केले.

सरकार आणि ‘कोमुनिदाद’मध्ये आहेत मतभेद

मडगाव कोमुनिदाद इमारतीची दुरुस्ती किंवा नूतनीकरणाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने त्यासाठी खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. मात्र, दक्षिण गोवा कोमुनिदाद समिती स्वत: दुरुस्ती करू पाहत आहे.

कोमुनिदाद समिती हे काम करण्यास तयार असल्याचे अध्यक्ष सावियो यांचे म्हणणे आहे. सध्या काम कोणी करावे यावरून सरकार व कोमुनिदाद समितीमध्ये मतभेद आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Engineer's Day 2024: विश्वेश्वरैय्या यांची दूरदृष्टी! गाेव्‍यात साकारलेला पाणीपुरवठा प्रकल्‍प 67 वर्षांनंतरही अबाधित

इन्स्टाग्राम यूजर्सच्या बाबतीत महासत्ता भारताच्या मागे! जाणून घ्या टॉप 6 देश

Photos: सुकुन...! जगातील 'या' सुंदर अभिनेत्री तुम्हाला माहितीयेत का? यादीत 'मस्तानी'चाही समावेश

ISL 2024-25: अकराव्या मोसमासाठी एफसी गोवाचा संघ जाहीर! केले आहेत हे बदल...

‘लोकल ते ग्‍लोबल’ प्रतिभावंत अभियंत्‍यांचा आज गौरव; ‘गोमन्‍तक टीव्‍ही’तर्फे कृतार्थ अभिवादन

SCROLL FOR NEXT