Calangute MLA Michael Lobo | St. Francis Xavier Dainik Gomantak
गोवा

'हे देवा वेलिंगकरांना माफ कर, त्यांना माहिती नाही ते काय बोलले', मायकल लोबोंची Xavier चरणी प्रार्थना

Michael Lobo On St. Francis Xavier: आमदार मायकल लोबो यांनी शुक्रवारी सकाळी ओल्ड गोव्यातील बॉसिलिका बॉम जिझस चर्च येथे दाखल होत संत फ्रान्सिस झेवियर चरणी प्रार्थना केली.

Pramod Yadav

ओल्ड गोवा: हिंदू रक्षा महाआघाडीचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची डिएनए चाचणी करण्याची मागणी केली. वेलिंगकराच्या या वक्तव्याने राज्यात वादंग निर्माण झाला. यावरुन राजकीय नेत्यांनी देखील भाष्य केले.

तर चर्चिल आलेमाव यांच्याकडून वेलिंगकरांविरोधात पोलिसांत तक्रार देखील दाखल करण्यात आली. दरम्यान, आता कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी वेलिंगकरांना माफ कर अशी प्रार्थना झेवियर चरणी केली आहे.

आमदार मायकल लोबो यांनी शुक्रवारी सकाळी ओल्ड गोव्यातील बॉसिलिका बॉम जिझस चर्च येथे दाखल होत संत फ्रान्सिस झेवियर चरणी प्रार्थना केली. लोबोंनी सुभाष वेलिंगकरांना माफ करावे अशी प्रार्थना केली. वेलिंगकर काय बोलले हे त्यांना माहिती नाही. ते काय बोलले याची त्यांना जाणीव व्हावी आणि त्यांच मन उजळून निघावे, अशी प्रार्थना मी झेवियर चरणी केल्याची माहिती लोबो यांनी दिली.

गेल्या दोन दिवसांपासून वेलिंगकर यांनी केलेल्या मागणीवरुन वाद होत आहे. यात राजकीय नेत्यांनी देखील उडी घेत वेलिंगकरांची मागणी चुकीची असल्याचे मत व्यक्त केले. चर्चिल आलेमाव, वॉरन आलेमाव यांनी थेट पोलिसांत तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली.

आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारच्या भूमिकेवर बोट ठेवत गोयच्या सायबाबद्दल हे ऐकून आता त्यांचा भावना दुखावल्या नाहीत का? असा सवाल उपस्थित केला. तर, भाजपने याप्रकरणी थेट वक्तव्य करण्यास टाळले.

त्यांच्या वक्यव्यवर प्रतिक्रिया देण्याची आम्हाला गरज नाही. काँग्रेस केवळ हिंदूना लक्ष्य करते, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर यांनी दिली. तसेच, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यावर टीका करताना आलेमावांचा डिएनए सर्व गोमंंतकीयांना माहिती आहे, असे वेर्णेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT