Goa Accident: कदंब बसचा ब्रेक झाला फेल, भीषण अपघातात 10 प्रवासी थोडक्यात बचावले
Kadamba bus overturns on Chimbel junctionDainik Gomantak

Goa Accident: उतारावरुन जाताना कदंब बसचा ब्रेक झाला फेल, भीषण अपघातात 10 प्रवासी थोडक्यात बचावले

Kadamba Bus Accident: बसमधील काहीजण किरकोळ जखमी झाल्याची माहिती असून, त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.
Published on

पणजी: प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या कदंब बसचा अपघात झाल्याची घटना शुक्रवारी (०४ ऑक्टोबर) सकाळी उघडकीस आली. बसवरील नियंत्रण सुटल्याने चिंबल जंक्शन येथे बस पलटी झाली. यावेळी बसमध्ये दहा प्रवासी असल्याची माहिती असून, काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर बांबोळी येथील गोमेकॉत उपचार सुरु आहेत.

Kadamba Bus Accident
Kadamba Bus AccidentDainik Gomantak

चिंबल जंक्शन उतारावरुन बस जात असताना बसवरील नियंत्रण सुटल्याने बस शेजारीज सुरु असलेल्या भुयारी मार्ग कामाच्या साईटवर जाऊन आदळली आणि पलटी झाली.

यावेळी बसमध्ये एकूण दहा प्रवासी होते. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. यातील काहीजण किरकोळ जखमी झाल्याची माहिती असून, त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.

Goa Accident: कदंब बसचा ब्रेक झाला फेल, भीषण अपघातात 10 प्रवासी थोडक्यात बचावले
Yuri Alemao: 'गोव्यातील जातीय सलोखा बिघडवण्याचं काम सुरु, गोमंतकीयांची खरी ओळख...'; आलेमाव स्पष्टच बोलले
Goa Bus Accident
Goa Bus AccidentDainik Gomantak

ब्रेक फेल झाल्याने अपघात?

बस चालकाने दिलेल्या माहितीनुसार, चिंबल जंक्शन उतारावरुन बस जात असताना बसचा अचानक ब्रेक फेल झाला. बस मार्गावरील इतर वाहनांवर जाऊन धडकू नये यासाठी बस मुख्य मार्गावरुन बाहेर वळवल्याची माहिती चालकाने दिली.

अपघातानंतर स्थानिक आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com