Carlos Álvares Ferreira Dainik Gomantak
गोवा

Oceanman Controversy: ‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? 'ओशनमन'वरुन फेरेरांचा सवाल; पर्यटनमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी

Carlos Ferreira: पोलिस सेवेतील आयपीएस अधिकाऱ्याने उद्धट वर्तन केल्याचा आरोप करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केला होती.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पोलिस सेवेतील आयपीएस अधिकाऱ्याने उद्धट वर्तन केल्याचा आरोप करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केला होती. त्यावर पर्यटन मंत्र्यांनी याविषयी स्पष्टीकरण द्यावे, तसेच मंत्र्यांनी आयपीएस अधिकाऱ्यावर आरोप केल्याने त्या अधिकाऱ्यावर भाजप सरकार कारवाई करणार आहे काय? असा सवाल आमदार कार्लोस फेरेरा यांनी केला आहे.

पर्यटन मंत्री खंवटे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकाऱ्यावर उद्धट वर्तन केल्याचा आरोप केला होता आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

त्यामुळे करंझाळे किनाऱ्यावर ओशनमन जलतरण स्पर्धा आयोजनाबाबत त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांकडे बोट दाखविले होते. त्यामुळे आता ही बाब गंभीर असल्याचे आमदार फरेरा यांनी नमूद केले आहे.

आमचे सहकारी अमित पालेकर यांनी किनारपट्टीवरील व्यावसायिकांचा हप्त्याचा दर वाढविला असल्याचा आरोप केला आहे, आता मंत्री खंवटे त्यांच्याकडे कारवाईसाठी पुरावे मागू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

याप्रकरणी आता भाजप सरकार त्या आयपीएस अधिकाऱ्यावर कारवाई करणार आहे की वेळ मारून नेणार आहे, असा सवाल त्यांनी केला. एखादा कॅबिनेट मंत्री जर आयपीएस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करीत आहेत, तेव्हा त्याची दखल राज्य सरकारने घेणे महत्त्वाचे असते, असेही फरेरा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT