Dengue in Goa Dainik Gomantak
गोवा

Dengue Cases In Goa: चिंताजनक! उत्तर गोव्यात डेंग्यू रुग्ण वाढले

North Goa: उत्तर गोव्यात सर्वाधिक ३९ रुग्ण बार्देश तालुक्यात आढळले

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून एकूण रुग्णांपैकी ९५ टक्के रुग्ण उत्तर गोव्यात आढळले आहेत. राज्यात एकूण ६० रुग्ण आढळल्याचा अहवाल आला असून त्यात उत्तर गोव्यात ५२, तर दक्षिण गोव्यात ८ रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य सेवा संचालनालयाने दिली आहे.

उत्तर गोव्यात सर्वाधिक ३९ रुग्ण बार्देश तालुक्यात आढळले आहेत. तालुक्याचे केंद्र असलेल्या म्हापसा शहरात १७ रुग्ण आढळले असून करासवाडा आणि खोर्ली परिसर प्रभावित झाला आहे.

साळगाव ८, पर्वरी ५, कोलवाळ ४, कांदोळी ३, हळदोणे १ आणि शिवोली १ अशी रुग्णांची संख्या आहे. साखळी ७, पेडणे १, डिचोली १, मये १, खोर्ली १ आणि चिंबल १ अशी इतर ठिकाणी आढळलेल्या रुग्णांची संख्या आहे, तर दक्षिण गोव्यात मडगाव १, वास्को १, शिरोडा १, कासावली १, काणकोण १ आणि कुठ्ठाळीत २ रुग्ण आढळले आहेत.

लोकांमध्ये डेंग्यूबद्दल माहिती, शिक्षण आणि संवाद (आयईसी) करून जागृती करण्यात आली असून आता वर्तन बदल संवाद (बीसीसी) सुरू करण्याची वेळ आली आहे. एखाद्या परिसरात डेंग्यूचा संसर्ग झाल्याची तक्रार केली जाते, तेव्हा बहुतांशवेळी तक्रारदाराच्या घरच्या कुंपणात स्रोत आढळला आहे.

यासाठी लोकांनी प्रथम आपल्या वर्तनात बदल आणण्याची गरज आहे. पाणी साचल्यानंतर सात दिवसांच्या जीवनचक्रात डेंग्यूचे डास तयार होतात. त्या अगोदरच पाणी साचू न देण्याची गरज असते. त्यामुळे आपल्या घरचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, अशी सूचना राष्ट्रीय संसर्गजन्य आजार उपक्रमाच्या गोव्यातील मुख्य अधिकारी डॉ. कल्पना महात्मे यांनी केली.

अहवालानंतर उलगडेल ‘त्या’ मृत्यूचे कारण’

डेंग्यूमुळे राज्यात एक बळी गेल्याचा संशय असून याची पृष्टी झालेली नाही. चाचणी अहवाल पुढील दहा दिवसांत आल्यानंतर ते समजेल, अशी माहिती डॉ. कल्पना महात्मे यांनी दिली. दक्षिण गोव्यात रुमडामळ येथे ५ वर्षीय मुलाचा मृत्यू डेंग्यूमुळे झाल्याचा दावा करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

Himachal Pradesh Landslide: हिमाचलमध्ये भीषण अपघात! चालत्या सुमोवर कोसळली दरड; 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

Israel Crime: इस्त्रायलमध्ये भारतीय नागरिकाची निर्घृण हत्या, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; 31 वर्षीय संशयिताला अटक

Mangal Gochar 2026: नोकरीत प्रमोशन अन् धनलाभाचे सुवर्ण योग! मृगशिरा नक्षत्रात मंगळाचे बली गोचर! ''या' राशींचे नशीब चमकणार

SCROLL FOR NEXT