Dengue Cases In Goa: डासांचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्मक उपाय; गोवा आरोग्‍य खाते सक्रिय

Dengue Cases In Goa: म्‍हापशात साडेसहा महिन्‍यांत डेंग्यूची १७ प्रकरणे नोंद
Dengue Cases In Goa
Dengue Cases In GoaDainik Gomantak

Dengue Cases In Goa

म्हापसा येथील नागरी आरोग्य केंद्र आपल्या कार्यक्षेत्रात डासांच्या संबंधित प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.

गेल्‍या जानेवारी महिन्यापासून म्हापसा नागरी आरोग्य अधिकारक्षेत्रात डेंग्यूची सुमारे १७ प्रकरणे नोंदवली गेली. जानेवारीत ४, फेब्रुवारी व मार्चमध्ये प्रत्येकी १, एप्रिलमध्ये शून्य तर मे महिन्यात दोन प्रकरणे नोंदवली गेली.

जूनमध्ये महिन्याच्या मध्यापर्यंत नऊ संशयित प्रकरणे नोंदवली गेली असली तरी या प्रकरणांची पुष्टी होणे बाकी आहे. स्थानिक पालिका मंडळाकडून आवश्यक पाठिंबा नसताना, आरोग्य अधिकारी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वारंवार उघड्यावर फेकला जाणारा कचरा, सांडपाणी गटारात सोडणे, धूळखात पडलेली वाहने यासंबंधीची विविध पत्रे पालिकेला लिहूनही कारवाई झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश परब यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी नियमित जागरूकता व स्वच्छतेच्या क्रियाकलापांची खात्री करत आहेत. तसेच डासांच्‍या प्रादुर्भावाबद्दल घरोघरी जागृती करत आहेत. वेक्टर बोर्न रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या अधिकारक्षेत्रात लार्व्हा प्रतिबंधक उपाय व इतर गोष्टी करतात.

लोकांनी आरोग्‍य खात्‍याला सहकार्य करावे

म्हापशात डेंग्यूचे काही विखुरलेले रुग्ण आढळले आहेत. आम्ही सर्व आवश्यक उपाययोजना करत आहोत. ज्यात डासांचा प्रसार कमी करणे, फॉगिंग क्रियाकलाप तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी विविध जागरूकता, क्रियाकलाप यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे, असे आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश परब यांनी सांगितले. तसेच आपला आसपासच्‍या परिसरात डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी लोकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहनही परब यांनी केले.

Dengue Cases In Goa
Haihaya King Ruled Goa: ऐतिहासिक गोव्यावर होती हैहय राजघराण्याची सत्ता; नवी माहिती प्रकाशात

डेंग्‍यूचा प्रसार रोखण्‍यासाठी आवश्‍‍यक ती सर्व खबरदारी घेण्‍यात येत आहे. तसेच लोकांमध्‍ये जागृती करण्‍यात येत आहे. घरात आणि आसपासच्‍या परिसरात पाणी साचू न देण्‍याचे आवाहन केले जातेय.

- डॉ. दिनेश परब, आरोग्याधिकारी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com