NSDC Job Fair Dainik Gomantak
गोवा

विदेशात नोकरी करायची पण शिक्षण नाही? फिकर नॉट! गोवासह इतर राज्यात होतोय NSDC चा मोफत जॉब फेअर, लगेच करा नोंदणी

जॉब फेअरमध्ये सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी सुरू झाली आहे.

Pramod Yadav

NSDC Job Fair In Goa: राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या वतीने गोव्यात आंतरराष्ट्रीय कौशल महोत्सव जॉब फेअर आयोजित केला जाणार आहे. या जॉब फेअरमध्ये फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. जॉब फेअरमध्ये सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी सुरू झाली आहे.

जॉब फेअरच्या माध्यामातून तरूणांना परदेशात नोकरी करण्याची देखील संधी मिळणार आहे. यासाठी मोफत नोंदणी सुरू झाली असून, त्याची मुदत देखील वाढविण्यात आली आहे.

विविध क्षेत्रात नोकरीची संधी शोधणाऱ्या फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवारांसाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या वतीने विविध राज्यात जॉब फेअर आयोजित केले जातात. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या (NSDC) (kaushalmahotsav.nsdcdigital.org) या संकेतस्थळावर जॉब फेअरसाठी मोफत नोंदणी करता येईल.

नोंदणीसाठी मुदत वाढवली

जॉब फेअरसाठी उमेदवारांना 09 एप्रिलपर्यंत मोफत नोंदणी करता येणार होती. दरम्यान यासाठी मुदत वाढवली असून, आता 16 एप्रिलपर्यंत मोफत नोंदणी करता येईल.

नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) इंटरनॅशनल, लॅमरिन टेक स्किल युनिव्हर्सिटी, (LTSU) पंजाब यांच्या सहकार्याने कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचा पहिला आंतरराष्ट्रीय कौशल महोत्सव (नोकरी मेळा) दोन्ही पद्धतीने (ऑनलाइन आणि ऑफलाइन)) आयोजित करत आहे.

गोवा राज्यासह देशभरातील विविध केंद्रांवर परदेशात नोकरी करण्यास उत्सुक असलेल्या उमेदवारांसाठी. नोकरी मेळा सर्व उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता विचारात न घेता खुला असणार आहे. त्यामुळे अधिकाधिक उमेदवारांनी या जॉब फेअरमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT