G20 च्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिस सतर्क, भाडेकरू पडताळणीत 101 जण ताब्यात

पोलिसांनी आज मुशिरवाडा येथे भाडेकरू पडताळणी मोहीम राबवून 101 जणांना ताब्यात घेतले.
G20 Goa
G20 GoaDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात होणाऱ्या G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिस चांगलेच सतर्क झाले आहेत. राज्यात घडणाऱ्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये परराज्यातील नागरिकांचा सहभाग वेळोवेळी दिसून आला आहे. त्यामुळे G20 च्या पूर्वी अशा बाहेरच्या राज्यातील नागरिकांचा शोध घेण्याची मोहिम सुरू आहे.

पोलिसांनी आज मुशिरवाडा येथे भाडेकरू पडताळणी मोहीम राबवून 101 जणांना ताब्यात घेतले.

राज्यात होणाऱ्या G20 शिखर परिषदेच्या पहिल्या बैठकीला केवळ चार दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. शिखर परिषदेचे पहिली बैठक 17 ते 19 एप्रिल 2023 या कालावधीत होणार आहे. त्यानुसार कोलवाळ पोलिसांनी आज सकाळपासून मुशिरवाडा येथे भाडेकरू पडताळणी मोहीम राबवत 101 जणांना ताब्यात घेतले. त्यातील 37 जणांकडे कोणतीही कागदपत्रे सापडली नाहीत.

बाहेरच्या राज्यातून गोव्यात येणाऱ्या नागरिकांना भाडेकरु नोंदणी करने बंधनकारक आहे, त्याबाबत पोलिस नाेंदणी करने गरजेचे आहे. अशी सूचना करण्यात आली आहे. दरम्यान,अनेक ठिकाणी इतर राज्यातून येणारे नागरिक नोंदणी करत नाहीत. त्यामुळे राज्यात काही गैरप्रकार घडला तर त्याची तपासणी आणि पडताळणी करण्यात अडचण होते. असे पोलिस म्हणाले.

G20 Goa
चार वर्षांनी वडिलांनी 'परत येतोय' असा फोन केला, 12 वर्षांची मुलगी घाबरली; आईला म्हणाली, 'बाबांनी माझ्यावर...'

गोव्यात राहणाऱ्या इतर राज्यातील लोकांची नोंदणी करून घ्यावी याबाबत घरमालकांना देखील सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, घरमालक याकडे दुर्लेक्ष करतात आणि एखाद्या गुन्ह्यात सहभाग असणारा बाहेरच्या राज्यातील व्यक्तीचा शोध घेणे पोलिसांना अडचणीचे होऊन जाते.

सध्या राज्यात होणाऱ्या G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिस सक्रिय झाले असून, विविध भागात भाडेकरू पडताळणी मोहीम राबवली जात आहे. यापूर्वी देखील लाला की बस्तीसह इतर ठिकाणी मोहीम राबवण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com