Sankhlim Municipality Election 2023 Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Municipal Council Election : आता 10 प्रभागांमध्ये निवडणूक

प्रवीण ब्लेगन, रियाझ खान बिनविरोध विजयी

दैनिक गोमन्तक डिजिटल

येथील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय खेळी साखळीत समोर आली आहे. प्रभाग क्र. ५ मधील टुगेदर फॉर साखळी गटाचे उमेदवार प्रवीण ब्लेगन व प्रभाग क्र. ८ मधील भाजप गटाचे उमेदवार रियाझ खान हे बिनविरोध निवडून आलेले आहेत.

या दोन्ही प्रभागांमधील इतर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने हे दोन उमेदवार मतदानापूर्वी नगरसेवक बनले आहेत. त्यामुळे आता साखळी नगरपालिकेच्या १२ पैकी १० प्रभागांसाठी ५ मे रोजी मतदान होणार आहे.

या दोन्ही उमेदवारांच्या बिनविरोध निवडीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथील भाजप कार्यालयात भाजप गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक रियाझ खान यांचे अभिनंदन केले.

साखळी प्रभाग क्र. ८ मध्ये बिनविरोध निवडून आलेल्या रियाझ खान व प्रभाग ५ मध्ये निवडून आलेल्या प्रवीण ब्लेगन यांचे अभिनंदन, तसेच या दोन्ही प्रभागांमधून आपली उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांचेही अभिनंदन करत असल्याचे म्हणत निवडून आलेल्या दोघाही नवनिर्वाचित नगरसेवकांनी साखळी पालिकेचा कारभार चांगला चालावा यासाठी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांचेही अभिनंदन करीत आहे.

साखळी पालिकेचा विकास चांगल्या पध्दतीने व्हावा तसेच प्रशासनातही पालिका अग्रेसर रहावी, यासाठी आमचा प्रयत्न राहिल,असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

‘टुगेदर फॉर साखळी’ ने खाते खोलले : ब्लेगन

टुगेदर फॉर साखळी या पेनलने साखळीत आपले खाते खोलले आहे. आता आपण साखळी नगरपालिका निवडणुकीत टुगेदर फॉर साखळीच्या इतर १० उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कार्य करणार आहे.

आपल्या प्रभागात भाजपकडे उमेदवारच नव्हता. ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केले होते, त्यांनी निकाल लक्षात घेऊन आपली उमेदवारी मागे घेतली, अशी प्रतिक्रिया नगरसेवक प्रवीण ब्लेगन यांनी व्यक्त केली.

"प्रभाग क्र. ८ मधील सर्व इतर उमेदवारांना आपणच या प्रभागात योग्य उमेदवार असल्याचे दिसल्याने त्या सर्वांनी आपली उमेदवारी मागे घेतली. आपण बिनविरोध निवडून येण्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आशीर्वाद आहे."

-रियाझ खान, नगरसेवक प्रभाग ८

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Income Tax Return: 31 जुलैची मुदत वाढणार का? आयटीआर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका

Dharmendra Pradhan Resigns: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर-मंतरवर जल्लोष! ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए…’,म्हणत अभिजीत दीपकेची टोलेबाजी VIDEO

Dharmendra Pradhan Resigns: सीजेपी आंदोलनापुढे अखेर मोदी सरकार झुकले! धर्मेंद्र प्रधान यांनी दिला केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा

Dona Paula Car Accident: वाहन पार्किंगचा हलगर्जीपणा चालकाला पडला महागात! उतारावरून गाडी थेट गॅरेजमध्ये, आलिशान वाहनाला धडक

Goa Farmers Fertilizer Mobile App: खत खरेदीसाठी 'ऑफलाइन' पर्यायही हवा; ॲप अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयावर क्रूझ सिल्वा यांची टीका

SCROLL FOR NEXT