Valpoi Turmeric Crop : आंबेडे-सत्तरीत हळदीचे विक्रमी पीक!

दीड एकरात अडीच क्विंटल : पण, बाजारेठच नसल्याने शेतकरी हवालदिल
Turmeric Crop
Turmeric CropDainik Gomantak

Valpoi : हळदीला पिवळे सोने म्हटले जाते. हळदीचे आणि गोव्याचे एक अतूट नाते आहे. गोव्याचे सुपुत्र डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यामुळे हळदीचे पेटंट भारताला मिळाले. पण याच आमच्या गोव्याच्या भूमीत हे बहुऔषधी गुण असलेले पीक दुर्लक्षीत आहे. आंबेडे नगरगाव येथील शेतकरी अनिरुद्ध जोशी यांनी सेंद्रीय पद्धतीने दीड एकरातून जवळपास अडीच क्विंटल हळदीचे उत्पादन घेतले आहे.

जोशींनी प्रथमतः सेलम जातीचे बियाणे आंबेगाव (सावंतवाडी) महाबळ यांचेकडून आणले, प्रायोगिक तत्वावर एक प्लाँट लावला. पण या प्लाँटमध्ये रानडुकराचा वावर नव्हता पण बाकी भागात रानडुकर मुक्त संचार करत होते, हे लक्षात आले. त्यानंतर यंदा सेलमबरोबर फुले स्वरुपा जातीचे बियाणे पुण्यातून आणून लावण्याचा प्रयत्न केला.

Turmeric Crop
Valpoi News : सत्तरी तालुक्यात क्रेझ केवळ दशावताराचीच...!

पाच वर्षापासून त्यांनी हळदीची लागवड त्यांनी केली आहे. यंदाचे सहावे वर्ष असून आपल्याला यश मिळाले आहे, असे जोशी म्हणाले. जोशी म्हणाले, काळ्या हळदीचीही लागवड केली आहे. काळी हळद हर्बल कंपन्या खरेदी करतात. आपल्या येथे मुबलक कच्चा माल मिळतो, म्हटल्यावर हर्बल कंपन्या येतील व लोकांना रोजगारही मिळेल.

...तर संस्थेपुढे धरणे धरणार !

हळदीला परदेशी चांगली मागणी आहे. शिवाय इतर भारतीय मसाले यांना सुद्धा चांगली मागणी आहे. जोशी यांचा माल तयार आहे मात्र बाजारपेठ नसल्याने माल कोण खरेदी करणार हा प्रश्न आहे, त्यामुळे त्यांनी वाळपई उपजिल्हाधिकारी, कृषी खाते, तसेच गोवा बागायदार संस्थेला संबंधितांकडे पत्राद्वारे हळद खरेदीसंबंधी विचारणा केली आहे. जर संबंधितांकडून 3 मे पर्यंत पत्राचा खुलासा मिळाला नाही, तर दि. 4 किंवा 5 मे रोजी ते संबंधित संस्थेत धरणे आंदोलन करणार, असा निर्धार जोशी यांनी व्यक्त केला आहे.

Turmeric Crop
Valpoi News : दीप्ती जोशी यांचे फणसाचे चिप्स, पापड पोहचले विदेशात

सुमारे 10 क्विंटलहून अधिक हळदीचे पीक घेतले आहे. आता हे पीक तयार झाल्याने काढणीस सुरुवात केली आहे. आतापर्यंतचा खर्च पहाता खत, बी, मशागत व इतर मजुरी धरुन सुमारे 18 हजारच्यावर खर्च आला होता. उपद्रवी प्राण्यांकडून हळदीला हानी होत नाही. पण बाजारपेठच नसल्याने मेहनत करून काय फायदा. - भिमराव राणे, शेतकरी अडवई सत्तरी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com