Notice of Hotel HQ in case of illegal construction in Vasco Dainik Gomantak
गोवा

वास्कोत बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी हॉटेल एचक्यूला नोटीस

हॉटेल व आस्थापना समोर वाहन पार्किंग करण्यास मज्जाव

दैनिक गोमन्तक

वास्को स्वतंत्र पथक मार्गावरील हॉटेल एचक्यू तसेच 1930 वास्को या आस्थापनांच्या रस्त्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीर केलेल्या बांधकामाबद्दल गोवा फर्स्टचे अध्यक्ष परशुराम सोनूर्लेकर यांनी केलेल्या तक्रारीला अनुसरुन नगर प्राधीकरण संचालनालयाने मुरगाव नगर पालिकेला नोटीस बजावून सात दिवसांच्या आत तक्रारीच्या मजकुराची तपासणी करून नगर प्राधीकरण संचालनालय कार्यालयात आवश्यक टिपण्या द्याव्यात अशी विनंती करण्यात आली आहे.

गोवा फर्स्टचे अध्यक्ष परशुराम सोनूर्लेकर यांनी 18 फेब्रुवारी 2022 रोजी वास्को येथील हॉटेल एचक्यू तसेच 1930 वास्को या आस्थापनांचे मालक व व्यवस्थापना विरुद्ध बेकायदेशीर अतिक्रमण आणि सेंट बॅंक (bank) जमिनीच्या रेंजिंगवर बांधकाम (Construction) केल्याबद्दल व ज्याच्यामुळे वाहन चालकांबरोबरच पादचाऱ्यांना या बेकायदेशीर कामाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच त्यांच्या सेक्युरिटी गार्ड कडून पादचाऱ्यांना पदपथावरून जाण्यास तसेच त्यांच्या हॉटेल व आस्थापना समोर वाहन पार्किंग करण्यास मज्जाव करत असल्याच्या कारणास्तव शहरी विकास विभाग महानगरपालिका (Municipality) तसेच नगर प्राधिकरण संचालनालयाकडे तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, गोवा फर्स्टचे अध्यक्ष परशुराम सोनूर्लेकर यांनी केलेल्या सदर तक्रारीला अनुसरून नगर प्राधिकरण संचालनालयाने मुरगाव (Mormugao) पालिकेला नोटीस बजावून सदर बेकायदेशीर बांधकामाविरोधात तक्रारीच्या मजकुराची तपासणी करून नगर प्राधिकरण संचालनालयात आवश्यक टिपण्या सात दिवसात सादर करण्याचे फर्मान सोडले आहे. मात्र सात दिवस उलटले तरी या तक्रारीची तसेच संचालनालयाकडून मागवलेल्या मजकूर पालिकेने संचालनालयाला दिला नसल्याचे सोनूर्लेकर यांच्याकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT