High Court issues notices Dainik Gomantak 
गोवा

पिसुर्ले पाणीटंचाई संदर्भात सरकारला बजावली नोटीस

दैनिक गोमन्तक

पणजी: पिसुर्ले गावात खनिज व्यवसायामुळे झालेली शेतजमिनीची नुकसानी तसेच पाण्याची समस्या यासंदर्भात समाजकार्यकर्ते हनुमंत परब यांनी सादर केलेली याचिका मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठसमोर सुनावणीसाठी आली असता प्रतिवादी सरकारी खात्‍यांना नोटीस बजावून त्यावरील सुनावणी येत्या 6 एप्रिलला ठेवली आहे. या सुनावणीपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांनी पिसुर्ले गावातील पाणीपुरवठ्याबाबत तपासणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. (Notice issued to goa government regarding water scarcity in Pisurle)

पर्ये मतदारसंघातील पिसुर्ले पंचायत क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची (Water) टंचाई भेडसावत असल्याने पाणीपुरवठा खाते तसेच खाण कंपन्यांनी पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे तेथील स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनावेळी याचिकादार हुनमंत परब यांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले व मारहाण केली. याचिकादार परब यांनी याचिकेत सरकारसह सार्वजनिक बांधकाम खाते, जलपुरवठा खाते, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, खाण खाते तसेच जिल्हा खनिज निधी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

पिसुर्ले पंचायत क्षेत्रात एकूण सात प्रभाग येतात. या भागात खाण व्यवसायामुळे नैसर्गिक झरे, विहिरी, तळी (Lake) लुप्त झाली आहेत. त्यामुळे येथील लोकांना पूर्णपणे नळाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. परंतु पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने लोकांना समस्यांना तोंड द्यावे लागते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT