वास्को : मुरगाव पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अमेय चोपडेकर यांची बिनविरोध निवड झाली. आज निवडीची निर्वाचन अधिकारी दत्तराज गावस देसाई यांनी औपचारिक घोषणा करून अमेय चोपडेकर यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. (Unopposed election of Ameya Chopdekar as the Deputy Mayor of Morgaon Municipality)
प्रभाग 18 चे नगरसेवक चोपडेकर यांचा एकमेव अर्ज मुख्याधिकारी जयंत तारी यांच्याकडे आल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार असल्याचे काल निश्चित झाले होते. श्रद्धा महाले यांनी 15 मार्च रोजी मुरगावच्या (Margao) उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्याप्रमाणे उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार काल अमेय चोपडेकर यांचा एकमेव अर्ज मुख्याधिकारी तारी यांच्याकडे आल्याने उपनगराध्यक्षपदी चोपडेकर यांची निवड निश्चित झाली. (Margao Municipality News)
दरम्यान आज निवडीची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी आज (सोमवारी दि.29 रोजी) सकाळी 11 वाजता पालिका सभागृहात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला मुरगावचे उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) दत्तराज गावस देसाई निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित होते. सुरुवातीला निर्वाचन अधिकारी गावस यांनी उपस्थित नगरसेवकांना वेचणूकचे नियम वाचून दाखवले. नंतर त्यांनी एकमेव अर्ज दाखल झाल्याने कुणाला या अर्जाराविषयी हरकत आहे का? यावर विचार विनिमय करण्यासाठी पंधरा मिनिटांचा अवधी देण्यात आला. सत्ताधारी गटातील नगरसेवकच या बैठकीला उपस्थित असल्याने या निवडीविषयी कुणी हरकत घेतली नसल्याचे निर्वाचन अधिकारी दत्तराज गावस देसाई अमेय चोपडेकर यांची मुरगाव पालिका (Margao Municipality) उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
उपस्थितीत नगराध्यक्ष दामोदर कासकर, माजी नगराध्यक्ष दीपक नाईक, नगरसेवक लिओ रॉड्रीगिस, दामोदर नाईक, विनोद किनळेकर, दयानंद नाईक, गिरीश बोरकर, सुदेश भोसले, विजय मयेकर, मंजुषा पिळणकर, प्रिया राऊत, मृणाली मांद्रेकर, रामचंद्र कामत आदींनी चोपडेकर यांना शुभेच्छा दिल्या.
उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना अमेय चोपडेकर यांनी, आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजसेवेचे व्रत अंगिकारले असल्याचे ते म्हणाले. समाज सेवेतून मी नगरसेवक (Corporator) झालो. तर आता माझी निवड उपनगराध्यक्षपदी झाल्याने माझ्या नगरसेवका बरोबर काम करून समाजसेवा अविरत चालू ठेवणार असल्याचे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.