Camurlim Land NOC Issue Dainik Gomantak
गोवा

Camurlim Comuninad: म्युटेशनसाठी फसवून एनओसी; कामुर्ली कोमुनिनादने घेतली हरकत; दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी

Camurlim Land NOC Issue: नुकत्याच झालेल्या जमीन हडपण्याच्या घटनेत गावकर नसलेल्या एका व्यक्तीला कामुर्ली कोमुनिदादची सुमारे ४ लाख चौ. मीटर जमीन क्षेत्रासाठी म्युटेशनसाठी फसवणूक करून एनओसी जारी करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: नुकत्याच झालेल्या जमीन हडपण्याच्या घटनेत गावकर नसलेल्या एका व्यक्तीला कामुर्ली कोमुनिदादची सुमारे ४ लाख चौ. मीटर जमीन क्षेत्रासाठी म्युटेशनसाठी फसवणूक करून एनओसी जारी करण्यात आली आहे. याप्रकरणी मुखत्यार हरी प्रभू यांच्या नेतृत्वाखाली कामुर्ली कोमुनिदादने आम्हा कमिटीला विश्वासात न घेता एनओसी दिल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. या जमीन हडप प्रकरणातील सर्व दोषींवर कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या फसव्या एनओसीचा कोणत्याही म्युटेशनसाठी विचार करू नये, अशी विनंतीही कोमुनिदाद कमिटीने संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे.

याप्रकरणी कामुर्ली कोमुनिदादतर्फे मुख्यमंत्री, महसूलमंत्री, थिवी आमदार, महसूल सचिव, उत्तर गोवा अधीक्षक, जिल्हाधिकारी, दक्षता संचालक, बार्देश मामलेदार, कोमुनिदाद प्रशासक, कोलवाळ पोलिस निरीक्षक यांना पत्रे लिहिली आहेत. कामुर्ली कोमुनिदादच्या मालमत्तेशी संबंधित एनओसी फसव्या पद्धतीने जारी केल्याप्रकरणी हे लेखी निवेदन दिले आहे.

कामुर्ली गावातील सर्व्हे क्र.१३५/०, १३६/० व १३९/० अशी ४,१०,८२५ चौ.मी जमीन असलेली मालमत्ता आहे. समितीने सांगितले की, ही मालमत्ता कामुर्ली कोमुनिदादच्या मालकीची व ताब्यात आहे. तसेच एक-चौदामध्ये प्रविष्ट केली आहे. मात्र, १९ ऑगस्ट २०२२ रोजी कोलवाळ येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने मालमत्तेच्या फॉर्म एक-चौदामध्ये त्याचे नाव म्युटेशन करण्यासाठी १९ ऑगस्ट २०२२ रोजी कोमुनिदादच्या प्रशासकाकडे एनओसीसाठी अर्ज केला. यासाठी संबंधिताने व्हील (इच्छापत्र) व इर्न्व्हट्री जोडलेली. त्यानुसार त्याच्या बाजूने आदेश देण्यात आला.

याविषयी कोमुनिदाद सदस्यांनी सांगितले की, वाद सोडवण्यासाठी पक्षकारांना सक्षम दिवाणी न्यायालयात जाण्याचे निर्देश देऊन आदेश पारित करण्यात आला आहे. सदस्यांनी दावा केला की, पक्षाच्या बाजूने अमलात आणलेली व्हील (इच्छापत्र) २६ सप्टेंबर २०१९ रोजी रद्द करण्यात आली. तसेच समितीच्या सदस्यांनी दावा केला की, टेनंटने या एनओसीवर आक्षेप घेतला आहे.

फसव्या पद्धतीचा वापर

कोमुनिदाद सदस्यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी कोमुनिदाद उत्तर विभागाच्या प्रशासकाने वरील तिन्ही सर्व्हे क्रमांकांच्या जमिनीशी म्युटेशन प्रक्रियेसाठी फसव्या पद्धतीने एनओसी जारी केली आहे. उत्तर विभागाच्या कोमुनिदादच्या प्रशासकांनी ही एनओसी बेकायदेशीर, फसवी आणि कोणत्याही अधिकाराशिवाय जारी केली आहे. ही फसवी एनओसी मोठी फसवणूक आहे. कारण कोमुनिदाद हे एकमेव मालक आहेत आणि पक्षाला दिलेल्या एनओसीचा जमिनीशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही, असे गावकार म्हणाले.

कागदपत्रे तपासावीत

कोमुनिदाद सदस्य असेही म्हणाले की, प्रशासकांनी सदर जमिनीशी संबंधित शीर्षक व मालकी हक्काची कागदपत्रे तपासली पाहिजे. मात्र प्रशासक तसेच कामुर्ली कोमुनिदाद कार्यालयातील नोंदींची पडताळणी करण्याऐवजी, प्रशासकाने केवळ व्हिल आहे असे गृहीत धरुन एनओसी जारी केली आहे. मुळात व्हिल कोणत्याही कोमुनिदाद जमिनीवर शीर्षक (टायटल) तयार करु शकत नाही आणि विशेषतः जे लिहिणाऱ्या व्यक्तीच्या मालकीचे नाही, असेही या लेखी निवेदनात म्हटले आहे. कोमुनिदादने असाही दावा केला की, जमिनीच्या मालकीची पडताळणी करण्यासाठी एनओसी जारी करण्यापूर्वी त्यांचे ऐकले गेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT