Sunbern Festival At Camurlim
म्हापसा: ज्यातून गैरप्रकारांना चालना मिळते, असे फेस्टिव्हल आम्हाला गावात नकोत. सनबर्नला कामुर्लीत विरोध करण्यासाठी मी सर्वांत पुढे असेन. कारण असे महोत्सव गाव तसेच नव्या पिढ्या उदध्वस्त करतात. आम्हाला गाव पुढच्या पिढीसाठी राखून ठेवायचा आहे, असे विधान कामुर्लीचे माजी सरपंच शरद गाड यांनी केले.
ते म्हणाले की, याआधीच दक्षिण गोव्यातील (South Goa) लोकांनी व बहुसंख्य पंचायतीने या फेस्टिव्हलला झिडकारले आहे. त्यामुळे सनबर्नला पंचायतीने सुद्धा पाठिंबा देऊ नये. तसेच जनहितार्थ नसलेल्या महोत्सवांना पाठिंबा देऊ लागलो तर लोकांचे शिव्याशाप आम्हाला लागतील. सनबर्नला माझा कठोर विरोध आहे आणि लोकांनी याला विरोधच केला पाहिजे.
कामुर्ली गावातील स्थानिक रोशन फडते म्हणाले की, कामुर्लीत सनबर्न महोत्सव आल्यास त्याला प्रखर विरोध असेल. आम्हाला गावात असे उपदव्याप नकोत. गावात एक मेगा प्रोजेक्ट येऊ पाहतोय. त्याला यापूर्वीच आम्ही हरकत घेतली आहे.
सनबर्नविषयी आताच बोलणे उचित ठरणार नाही. अद्याप आमच्याकडे औपचारिक काहीच आलेले नाही. याविषयी वर्तमानपत्रांतूनच वाचनात आले आहे. त्यामुळे आधीच भाष्य करणे योग्य नाही.
लक्ष्मण नाईक, सरपंच, कामुर्ली
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.