Water Sports In Colva Beach  Dainik Gomantak
गोवा

Goa Beach: बायणा किनारी बेकायदा जलक्रीडा नको

Goa Beach: जुझे फिलीप डिसोझा: मुख्यमंत्र्यांना संघटनेतर्फे निवेदन सादर

दैनिक गोमन्तक

Goa Beach:

बायणा - वास्को येथील समुद्रकिनाऱ्यांवर काही बेकायदा जलक्रीडा व्यावसायिकांनी कब्जा केला आहे. त्यामुळे स्थानिक जलक्रीडा व्यावसायिकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे त्यांना बायणा येथे व्यवसाय करण्यास बंदी घाला, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना भेटून केली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या शिष्टमंडळाला किनारपट्टी पोलिस अधीक्षकांबरोबर चर्चा करून या बेकायदेशीर जलक्रीडा व्यावसायिकांवर बंदी घालण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.

कळंगुट, बागा व नेरूल येथील जलक्रीडा एजंट हे बायणा व बोगमाळो येथे त्यांना परवानगी नसताना जलक्रीडा प्रकार व्यवसाय करून बायणा क्रीडा व्यावसायिकांवर अन्याय करत आहेत. या ठिकाणी काही दलाल त्यांना यासाठी मदत करत आहेत. त्यामुळे बायणा येथील जलक्रीडा संघटनेच्या व्यावसायिकांना हा व्यवसाय बंद करण्याची पाळी आली आहे.

या संघटनेचे 40 सदस्य आहेत व गेली अनेक वर्षापासून हा व्यवसाय या बायणा समुद्रकिनाऱ्यावर सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या समस्या ऐकून घेतल्या व किनारपट्टी पोलिस अधीक्षकांशी चर्चा करून बेकायदा जलक्रीडा व्यवसाय करणाऱ्या एजंटांना तेथे बंदी घालण्याचे निर्देश दिले जातील,

असे आश्‍वासन दिल्याची माहिती जुझे फिलीप डिसोझा यांनी दिली. पर्यटन खात्याने प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर तेथील स्थानिकांना जलक्रीडा व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले आहे.

बायणा येथेही तेथील स्थानिक हा व्यवसाय करून उदरनिर्वाह गेली अनेक वर्षे करत आले आहेत. मुख्यमंत्र्यांना यामध्ये लक्ष घालून बायणा जलक्रीडा व्यावसायिकांना न्याय द्यावी, अशी विनंती करण्यात आल्याचे डिसोझा यांनी सांगितले.

बिगर गोमंतकीय एजंट

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बायणा समुद्रकिनाऱ्यावर जलक्रीडा प्रकार व्यवसायाला परवानगी दिली होती. या व्यवसायावर या सदस्यांची कुटुंबे अवलंबून आहेत. या व्यवसायासाठी लागणारे कर्मचारी त्यावर अवलंबून आहेत. या ठिकाणी पॅरासेलिंग, जॅटस्की, बोटीने फेरफटका तसेच स्कुबा डायव्हिंग यासारखे जलक्रीडा पर्यटकांना उपलब्ध करण्यात आले असताना काही इतर समुद्रकिनाऱ्यावरील बिगर गोमंतकीय एजंट बायणा येथे अतिक्रमण करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT