Goa Loksabha Congress
Goa Loksabha CongressDainik Gomanatk

Goa Politics: लुटारू, दरोडेखोरांवरच श्वान भुंकतात: काँग्रेसची टीका

Goa Politics: मुख्‍यमंत्र्यांच्या वक्‍तव्‍यावर काँग्रेसची प्रतिक्रिया
Published on

Goa Politics:

सावर्डे येथे झालेल्‍या एका सभेत बोलताना मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्‍यावर टीका करताना, राहुल गांधींच्‍या न्‍याय यात्रेच्‍यावेळी त्‍यांच्‍या गाडीत कुत्रा होता आणि या कुत्र्याला त्‍यांनी बिस्‍कीट भरविण्‍याचा प्रयत्‍न केला.

पण कुत्रा ते बिस्‍कीट खात नसल्‍यामुळे त्‍यांनी ते जवळ असलेल्‍या कार्यकर्त्याला दिले, असे वक्‍तव्‍य केले होते. यावरू काँग्रेसने समाजमध्यमावर टीका केली.

लुटारू आणि दरोडेखोरांवर श्वान भुंकतात. भाजप सरकारने गेल्या 11 वर्षात गोव्यातील सरकारी तिजोरी आणि जनादेश लुटला, म्हणूनच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निष्ठावंत आणि विश्वासू प्राणी कुत्र्याबद्दल द्वेष आहे.

Goa Loksabha Congress
Lok Sabha Election: उमेदवारीचा पेच कायम; पण वैयक्तिक पातळीवर प्रचार सुरू

राष्ट्राचे प्रामाणिक नेते राहुल गांधी यांचे गोव्यातील कुत्र्यांवर प्रेम आहे याचा आम्हाला अभिमान आहे. डॉक्टर, वायफळ बडबड थांबवा! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निराधार विधानावर काँग्रेस पक्षाकडून सडकून टीका केली आहे.

या ट्‍वीटला राहुल गांधी गोव्‍यात येऊन कत्र्याची पिल्‍ले दत्तक घेतात, तो फोटो जोडण्‍यात आला आहे. काँग्रेस नेत्‍यासाठी आपले कार्यकर्ते यासंबंधी जे ट्विट केले आहे, त्‍यात कुत्रा हा निष्‍ठावंत आणि विश्‍वासू आहे. मात्र असे कुत्रे लुटारु व दरोडेखोरांवर भूंकतात, त्‍यामुळेच प्रमोद सावंत त्‍यांचा द्वेष करतात,असेही समाज माध्यमावर काँग्रेसने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com