Cuncolim Municipality Dainik Gomantak
गोवा

Cuncolim Municipality : अखेर कुंकळ्‍ळी नगराध्यक्ष लक्ष्‍मण नाईक पायउतार

युरी गटाची सरशी : अविश्‍‍वास ठराव ९ विरुद्ध ० मतांनी संमत

गोमन्तक डिजिटल टीम

Cuncolim Municipality : गेले 27 महिने कुंकळ्‍ळीच्‍या नगराध्यक्षपदावर असलेले डॉ. लक्ष्मण नाईक यांची अखेर आज मंगळवारी उचलबांगडी करण्यात आली. 14 पैकी 9 नगरसेवकांनी त्‍यांच्‍याविरोधात आणलेल्‍या अविश्‍‍वास ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर लक्ष्मण नाईक व 4 भाजप समर्थक नगरसेवक गैरहजर राहिले.

नगराध्यक्ष नाईक यांच्याविरोधात 8 नगरसेवकांनी अविश्वास ठरावाची नोटीस दिली होती. नगरविकास खात्याच्या संचालकांनी या ठरावावर चर्चा करण्यासाठी आज खास बैठक बोलावली होती. काँग्रेस आमदार व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे 7 समर्थक नगरसेवक, युरींशी फारकत घेऊन वेगळे झालेले नगरसेवक उदेश देसाई व भाजप समर्थक नगरसेवक राहुल देसाई यांनी लक्ष्मण नाईक यांना पदावरून खाली खेचण्यासाठी मतदान केले.

लेन्‍ड्री मास्कारेन्‍हस, रेमंड डिसोझा, जॉन डायस, जेमिरा पिरीस, अँथनी वाझ, रेखा फर्नांडिस, गौरी शेटकर, उदेश देसाई व राहुल देसाई यांनी अविश्वास ठरावाच्या समर्थनार्थ मतदान केले. लक्ष्मण नाईक, विदेश देसाई, विशाल देसाई, पोलिटा कारनेरो व रुपा गावकर बैठकीला गैरहजर राहिले. लक्ष्मण नाईक नगरसेवकाना विश्वासात घेत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला होता.

दरम्यान, कुंकळ्‍ळीतील भाजप समर्थक नगरसेवकांमध्‍ये फूट पडली आहे. भाजप समर्थक नगरसेवक राहुल देसाई व गेल्या वेळी भाजपला साथ दिलेले उदेश देसाई यांनी युरी आलेमाव गटाशी संधान बांधले. त्याचा फायदा युरी गटाला झाला.

पुढील नगराध्‍यक्ष लेन्‍ड्री मास्कारेन्‍हस?

अविश्वास ठराव आणलेल्या नगरसेवकांच्या पाठिंब्यावर व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या आशीर्वादाने लक्ष्मण नाईक कुंकळ्‍ळीचे नगराध्यक्ष बनले होते. दोन वर्षांनंतर नगराध्यक्षपद दुसऱ्या नगरसेवकाला देण्याचा अलिखित करार झाला होता. नाईक यांनी हा करार मोडल्यामुळे व युरी आलेमाव यांच्या शब्दाला मान न दिल्यामुळे त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणावा लागला, असे युरी समर्थक नगरसेवकांनी सागितले.

आता लेन्‍ड्री मास्कारेन्‍हस यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडण्‍याची शक्‍यता आहे. युरी गटाशी फारकत घेऊन गोवा फॉरवर्डमध्‍ये गेलेले व गेल्या वेळी लक्ष्मण नाईक यांच्याविरोधात अविश्वास ठरावावर सही केली म्हणून गोवा फॉरवर्ड पक्षातून हाकलपट्टी केलेले उदेश देसाई यांना उपनगराध्यक्षपद मिळू शकते.

माझ्‍यावर लावण्‍यात आलेले सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत. गेल्‍या २७ महिन्यांच्या कार्यकाळात मी काहीही चुकीचे व गैर केलेले नाही. तसेच खोटे कधीच खपवून घेतले नाही. नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारला. त्याचे इनाम आपल्याला अविश्वास ठरावाद्वारे मिळाले आहे.

डॉ. लक्ष्मण नाईक, माजी नगराध्यक्ष (कुंकळ्‍ळी)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT