Nilesh Cabral visits madgaon canacona road project Dainik Gomantak
गोवा

मडगाव-काणकोण हमरस्त्याचे काम बंद होण्यास कंत्राटदार कारणीभूत

काम सोडलेल्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार, निलेश काब्राल यांचं स्पष्टीकरण

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगाव - काणकोण राष्ट्रीय हमरस्ता डांबरीकरणाचे काम बंद खात्याच्या अनास्थेमुळे किंवा कंत्राटदाराला पैसे न दिल्यामुळे बंद झालेले नसून कंत्राटदाराने हे काम अर्ध्यावर सोडून दिल्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकले नाही, असा खुलासा आज सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांनी केला.

काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी काल काणकोणमधील नागरिकांसह सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर आज मंत्री काब्राल यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यासह नावेली येथे रस्त्याची पाहणी केली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना काब्राल (Nilesh Cabral) म्हणाले, हे काम केंद्रीय मंत्रालयातून होत असून या कामाचे पैसे कधी अडवून ठेवले जात नाहीत. तरीही या कंत्राटदाराने हे काम अर्ध्यावरच सोडले. या कंत्राटदाराला आता काळ्या यादीत टाकले जाणार असून लहान लहान टप्प्यात शॉर्ट टेंडर काढून हे डांबरीकरणाचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारतर्फे (Goa Government) जी कामे हातात घेतली जातात त्या कंत्राटदारांचे अंतिम बिल देण्यासाठी उशीर होतो हे मान्य करताना काब्राल यांनी या कंत्रादाराना त्यांचे बिलाचे पैसे वेळेवर मिळतील यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नावेली येथील धोकादायक वळणाचीही काब्राल यांनी पाहणी केली. नावेलीचे पंच सदस्य यावेळी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

VIDEO: 'भगवान श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करायचे', मौलाना जरजिस अंसारीचा खळबळजनक दावा; हिंदू संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT