Long Que for PUC Certificate
Long Que for PUC CertificateDainik Gomantak

कारवाईचा धसका, गोव्यात दरदिवशी 6000 पीयूसी सर्टिफिकेट जारी

गोव्यात नवीन मोटार वाहन कायद्याची प्रभावी अमलबजावणी सुरु
Published on

पणजी : गोव्यात नवीन मोटर वाहन कायदा लागू करण्यात आल्यानंतर वाहनचालकांनी कारवाईचा चांगलाच धसका घेतल्याचं चित्र आहे. दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी कागदपत्रांची जमवाजमव सुरु केली आहे. प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रासाठी पीयूसी केंद्रासमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा असल्याचं चित्र आहे.

Long Que for PUC Certificate
गोव्यात पाणीप्रश्न पेटलेलाच, बाणावलीत मात्र पाण्याची नासाडी

गोव्यात 1 एप्रिलपासून नवीन मोटार वाहन कायदा लागू करण्यात आला आहे. पोलिसांनी (Goa Police) कायद्याची कडक अमलबजावणी सुरु केली असून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगाही उचलण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी एका दिवसात तब्बल 6182 पीयूसी सर्टिफिकेट जारी करण्यात आली आहेत. नवीन मोटार वाहन कायदा लागू केल्यानंतर दरदिवशी जवळपास 6 हजार पीयूसी सर्टिफिकेट दिली जात आहेत. नवीन कायदा लागू करण्याची घोषणा होताच दरदिवशी जवळपास 1500 ते 1800 सर्टिफिकेट दिली जात होती. मात्र गोव्यात (Goa) जेव्हा त्याची अमलबजावणी सुरु झाली तेव्हापासून वाहनचालकांच्या पीयूसी सेंटरबाहेर लांबच लांब रांगा दिसून येत आहेत.

Long Que for PUC Certificate
गोव्यातून बेपत्ता, तेलंगणात घरी पोचलेल्या तरुणाच्या अंगावर संशयास्पद खुणा

गेल्या चार दिवसात दरदिवशी जवळपास 6 हजार पीयूसी दिल्या जात आहेत. कायद्याच्या अमलबजावणीची घोषणा केल्या दिवशी हा आकडा 4 हजार इतका होता. मात्र येत्या काही दिवसात ही संख्या 2500 ते 3000 वर येईल, अशी माहिती वाहतूक संचालक राजन सातार्डेकर यांनी दिली आहे. मोठ्या शहरांमध्येच लांबच्या लांब रांगा असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. राज्यात सध्या 74 पीयूसी (Pollution) सेंटर असून यातील 8-9 सेंटर्स काही दिवसांमागेच सुरु करण्यात आली आहेत. ज्यांना पीयूसी सेंटर उघडायचं असेल अशांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यांना सेंटरसाठी परवानगी दिली जाईल, असंही सातार्डेकर म्हणाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com