Nilesh Cabral Press Conference After Resignation
सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरभरती करताना सत्ताधारी आमदारांनी केलेल्या शिफारशी केराच्या टोपलीत टाकणे मंत्री नीलेश काब्राल यांना भोवले आहे. कालपर्यंत पक्षश्रेष्ठींनी किंवा मुख्यमंत्र्यांनी आपल्याला राजीनामा दिल्याची सूचना केली नाही, असे म्हणत मंत्रिपद वाचवण्याची धडपड करणाऱ्या काब्राल यांना अखेर आज (रविवारी) बिनशर्त आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर करावा लागला आहे.
आज सायंकाळी ७ वाजता राजभवनाच्या जुन्या दरबार सभागृहात होणाऱ्या एका साध्या समारंभात नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. याबाबत नीलेश काब्राल यांनी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली.
आरोप कायमस्वरूपी नसतात, ज्यांनी आरोप केलेत त्यांनी ते सिद्ध करावेत
माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास मी आमदार पदाचाही राजीनामा देईन
विधानसभेत आताही कुणी टीका केली तर मी बोलेनच
एनडीजीआरएस मी सर्वात आधी सुरु केले. अनेक गोष्टी मी सुरु केल्या आहेत
लोकांना वाटत असेल कि पक्षाच्या विरोधात बोलेन तर असे होणार नाही
मुख्यमंत्री व केंद्रीय नेत्यांनी विनंती केल्याने मी राजीनामा दिला माझ्यावर दबाव आणला असता तर मी राजीनामा दिला नसता
कुडचडेची जनता माझ्यासोबत आहे; त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे
उद्या मी मुख्यमंत्री देखील होईन, कदाचित मुख्यमंत्री केंद्रात जातील व मला मुख्यमंत्री पद मिळेल
माझ्यावर होणाऱ्या ट्रोलिंगचा काही फरक पडत नाही
मी पेट्रोल, गाडी भत्ता, किंवा कोणत्याही सरकारी सुविधेचा वापर केलेला नाही
मी गेल्यावर सरकारचे नुकसान होईल; माझे होणार नाही
लोकच मला पुन्हा निवडून देतील
मंत्रीपद गेले असले तरी मी आमदार आहे; आता लोकांसोबत अधिक संपर्क वाढून चांगले काम करता येणार
मनोहर पर्रीकर माझे आदर्श आहेत.
कचरा व्यवस्थापन, वीज यासाठी मी पुढाकार घेतला
कोणताच राजकीय पक्ष सत्ता सोडणार नाही , प्रत्येक पक्षाला सत्तेत यायचे असते
पक्ष कुणाशिवाय चालणार नाही असे होत नाही. मी पक्षाच्या निर्णयासोबत आहे आणि मी पक्षासोबत आहे
माझे वडील स्वातंत्र्यसैनिक होते त्यांनी कधी पेन्शन घेतली नाही, माझ्यात माझ्या वडिलांचे गुण आले आहेत मी; लोकांसाठी काम करतो. मी तळागाळात काम करणारा कार्यकर्ता आहे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.