Goa Updates 19 November: काब्राल यांचा राजीनामा ते सिक्वेरा यांचा शपथविधी... एका क्लिकवर जाणून घ्या गोव्यात दिवसभरात काय घडले?

Goa Breaking News 19 November 2023: सिक्वेरांना मंत्रीपद ही चांगली गोष्ट - खासदार श्रीपाद नाईक
Goa Live Updates 19 November 2023 | Nilesh Cabral Dismissed
Goa Live Updates 19 November 2023 | Nilesh Cabral DismissedDainik Gomantak
Published on
Updated on

सिक्वेरांना मंत्रीपद ही चांगली गोष्ट - खासदार श्रीपाद नाईक

सिक्वेरांना मंत्रीपद मिळाले ही चांगली गोष्ट आहे. त्यात खूप विलंब झाला. सध्या आणखी काही बदल होणार नाहीत, असे खासदार श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

कोणते खाते मिळणार हे मुख्यमंत्री ठरवतील - आलेक्स सिक्वेरा

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आलेक्स सिक्वेरा यांना पत्रकारांनी खात्याबाबत प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, मी जर मुख्यमंत्री असतो तर मी मला पाहिजे ते खाते घेतले असते. मुख्यमंत्री ठरवतील ते खाते मिळेल.

आलेक्स सिक्वेरा यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ 

आमदारा आलेक्स सिक्वेरा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. तसेच मंत्रीमंडळातील इतर मंत्री, खासदार श्रीपाद नाईक आदी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमधून आठ आमदार भाजपमध्ये दाखल झाले होते. या आमदारांपैकी दिगंबर कामत आणि आलेक्स सिक्वेरा यांचे नाव मंत्रीपदासाठी नेहमी आघाडीवर होते. अखेर आता त्यातील एक जण आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रीपद मिळाले आहे.

मंत्रिपदाचा राजीनामा वाचताना नीलेश काब्राल...

इफ्फीचे काम अजूनही सुरूच...

54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून (20 नोव्हेंबर) गोव्यात सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर पाहिले तर इफ्फीचे काम अजूनही सुरूच असल्याचे निदर्शनास येते.

अजूनही कार्यक्रमस्थळी कामगार सजावटीचे काम करताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी हे काम 99 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाल्याचे सांगितले असले तरी अद्याप ते पूर्णत्वास पोहोचलेले नाही.

जर माझ्यावर दबाव आणला असता तर राजीनामा दिलाच नसता: नीलेश काब्राल

Nilesh Cabral
Nilesh CabralDainik Gomantak

सरकारच्या प्रकल्पांचा मला फटका, मताधिक्य झाले कमी!

तन्मार,रेल्वे दुपदरीकरण आणि कचरा प्रक्रिया प्रकल्प या तीन गोष्टींमुळे मला मते कमी मिळाली. मी ठामपणे या प्रकल्पांना पाठिंबा दिला होता.

माझ्यावर राजीनाम्यासाठी दबाव नाही:  नीलेश काब्राल

मला केंद्रीय पक्षनेते आणि मुख्यमंत्री सावंत यांनी राजीनामा देण्यास विनंती केली. त्यांनी माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणला नाही. जर राजीनाम्यासाठी जबरदस्ती केली असती तर मी राजीनामा दिला नसता. पक्षाचा जो निर्णय असेल तो मी मानेन. त्यांनी मला मुख्यमंत्री व्हायला सांगितले तर मी तो ही स्वीकारेन.

समुद्रात रंगणार कोची ते गोवा रेसचा थरार; 5 दिवसांत कापणार 667 किमी अंतर

भारतीय नौदल समुद्र एक्सप्लोअर करणाऱ्या, सागरी परिक्रमा करणाऱ्या पुढील पीढीचा शोध घेत आहे.

त्याचाच एक भाग म्हणून नौदलातर्फे कोची ते गोवा या इंटर कमांड सागरी नौकायन शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातून खोल समुद्रात सागरी मोहिमांसाठी जाणाऱ्या जवानांचा शोधही घेतला जाणार आहे.

22 नोव्हेंबरपासून या शर्यतीला सुरवात होत आहे. इंडियन नेव्हल सेलिंग असोसिएशनतर्फे या रेसचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीत आठ महिला अधिकारी आणि अग्निवीरांसह चार संघ आणि एकूण 32 कर्मचारी सहभागी होणार आहेत.

देर आए दुरुस्त आए....

आलेक्स सिक्वेरांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार ही माहिती वाऱ्यासारखी राज्यभरात पसरल्यानंतर दिगंबर कामत यांनी सिक्वेरांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर सद्यस्थितीवर भाष्य करत कामत म्हणाले की, ही गोष्ट घडण्यासाठी बराच कालावधी गेला; पण हरकत नाही, हे व्हायचेच होते. याबद्दल मी खूप खुश आहे. मी सिक्वेरांचे मनापासून अभिनंदन करतो. जरा उशिरानेच का होईना पण अखेर ते मंत्रिमंडळामध्ये सामील होत आहेत.

याबाबत पत्रकारांनी त्यांच्या मंत्रीपदाबद्दल विचारले असता, सारवासारव करत कामत म्हणाले की, मी सध्याच्या राजकीय निर्णयावर खुश आहे. माझ्याबद्दलचा निर्णय योग्यवेळी पक्षातर्फे घेतला जाईल.

राजीनाम्यानंतर नीलेश काब्रालांनी काढली मनोहर पर्रीकर यांची आठवण!

मी कार्यरत असताना कधीही सरकारी सुविधा वापरल्या नाहीत. स्व. मनोहर पर्रीकर यांच्या मार्गदर्शनामुळे मी राजकारणात उतरलो. मात्र मुख्यमंत्री आणि पक्षश्रेष्ठींंनी सांगितल्यामुळे मी राजीनामा दिला.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार! वाळपई पोलिसांकडून संशयिताला अटक

होंडा येथील अनिल देसाई (48, पिसुर्ले वडाकडे) यांच्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रकार घडला. वाळपई पोलिसांनी या संदर्भात गुन्हा नोंद केला असून त्याला अटक केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, होंडा सत्तरी येथे अनिल देसाई यांचे दुकान आहे. या दुकानात एक अल्पवयीन मुलगी काम करत होती. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर तो अतिप्रसंग करीत असल्याची तक्रार वाळपई पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली.

काब्रालांना राजीनाम्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींंचा: मुख्यमंत्री

नीलेश काब्राल यांचा राजीनामा मी राज्यपालांकडे पाठवला आहे. काब्रालांना राजीनाम्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींंनी दिला. आज (रविवार) संध्याकाळी 7 वाजता आलेक्स सिक्वेरांचा शपथविधी पार पडेल. मुख्यमंत्र्यांची माहिती

...आणि कुडचडे भाजप मंडळ तोंडावर पडले!

पीडब्ल्यूडी नोकरभरती गैरव्यवहार उघड करणारे दै. गोमन्तक कुडचडेत विकू न देण्याचा इशारा देणारे कुडचडे भाजप मंडळ पडले तोंडावर. पत्रकार परिषद सुरु असतानाच काब्रलांच्या राजीनाम्याचे गोमन्तकचे वृत्त ठरले खरे. कुडचडे, सावर्डेच्या स्थानिक पत्रकारांनी हरकत घेतल्यानंतर मंडळाकडून नरमाईची भूमिका आणि सारवासारव.

अखेर काब्राल बडतर्फ, सिक्वेरांचा संध्याकाळी शपथविधी!

अखेर पीडब्ल्युडी मंत्री निलेश काब्राल बडतर्फ. दिल्लीतून आदेश. आलेक्स सिक्वेरांचा आज रविवारी संध्याकाळी शपथविधी.

धारबांदोडा जंक्शनवर अपघात; दोघे जखमी

धारबांदोडा जंक्शनवर स्कूटर व बाईक रायडरचा अपघात. स्कूटरचालक दाभाळच्या दिशेने जात असताना जंक्शनवरील वळणावर अपघात घडला. यामध्ये स्कूटरचालक गंभीर जखमी. त्याला GMC मध्ये दाखल केले असून बाईक रायडरवर उसगावमधील इस्पितळात उपचार सुरू.

Accident
AccidentDainik Gomantak

नदीत उडी मारलेल्या युवतीचा मृतदेह सापडला. शुक्रवारी सायंकाळी अनुपमा गावकर या युवतीने आमोणे पुलावरून नदीत मारली होती उडी. पिळगाव येथे नदीत तरंगताना आढळला मृतदेह.

धारबांदोडा वंडाळा येथे ब्लॅक पॅंथरला पकडण्यासाठी वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला बिबट्या. बिबट्या अडकल्याने या परिसरात अशा प्राण्यांचा संचार असल्याचे सिद्ध.

‘मरळ’ मासा गोड्या पाण्यातील ‘इसवण’; हैदराबादमध्ये मोठी मागणी

पणजी, गोड्या पाण्यातला ‘इसवण’ म्हणून ज्याला संबोधले जाते त्या ‘मरळ’ या माशांना दक्षिण भारतात मरळ माशांना मोठी मागणी आणि बाजारपेठ आहे.

पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, हैदराबाद, आंध्र प्रदेश या भागातील लोक मरळ माशांची मागणी करतात, अशी माहिती पणजीतील मत्स्य उत्पादक डेरिल नुनेस यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com