Nilesh Cabral  Dainik Gomantak
गोवा

अटल सेतूची डागडुजी झाल्यावरच देखभाल!

जुन्या जुआरी पुलावरून अवजड वाहने बंद असल्याने ही वाहने बोरी पुलावरून वळवण्यात आली आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी : ‘अटल सेतू’ पुलाच्या डागडुजीचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत या पुलाच्या देखभालीचे काम सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे केले जाणार नाही. या पुलाचे काम सध्या गोवा राज्य साधनसुविधा ‘सुडा’तर्फे केले जात आहे. या पुलावरील जागोजागी पडलेल्या खड्ड्यामुळे वाहतुकीची समस्या वाढली आहे असे मत सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी व्यक्त केले.

गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाने या पुलाच्या तपासणीचे काम आयआयटी मद्रास यांच्याकडे सोपविले असून समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाय काढण्याची गरज आहे. या पुलाच्या डागडुजीचे काम तसेच वारंवार रस्त्यावर पडणारे खड्डे या समस्यांवर तोडगा निघाल्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याकडे त्याच्या देखभालीचे काम घेतले जाईल. सरकारचा गोव्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. मात्र काही तांत्रिक कारणास्तव त्याची समस्या सुरू झाली आहे असे काब्राल म्हणाले.

जुन्या जुआरी पुलावरून अवजड वाहने बंद असल्याने ही वाहने बोरी पुलावरून वळवण्यात आली आहेत. त्यामुळे या पुलावरील या वाहनांची वर्दळ वाढली आहे व खड्डे पडले आहेत. बोरी पुलावरील खड्डे बुजवायचे झाल्यास हा पूल किमान दहा तास बंद ठेवणे गरजेचे आहे जे शक्य नाही, असे काब्राल म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT