विरोधकांच्या विभाजनाचा भाजपलाच होणार फायदा !

प्रतिस्पर्धी आमदार सुस्त : पावसाळी अधिवेशनाची तयारी शून्य
Pramod Sawant
Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला एक महिन्याहून कमी काळ शिल्लक आहे. तरीही अजूनही विरोधक एकसंध झालेले दिसत नाहीत. विरोधक विभाजित असल्याने विधानसभेत याचा थेट फायदा भाजप सरकारला होणार आहे. विरोधक एकसंध झाले असते, तर अधिवेशन सरकारला जड जाण्याची शक्यता होती. परंतु सद्यःस्‍थिती पाहता सरकारला काटकसर करण्याची आवश्‍यकता पडणार नाही.

Pramod Sawant
विद्यार्थी बुडून मृत्यूप्रकरणी शिक्षकांवर टांगती तलवार!

सध्या विधानसभेत विरोधी बाकड्यांवर 15 आमदार आहेत. यात काँग्रेस - 11, आम आदमी पक्ष (आप - 2), गोवा फॉरवर्ड पक्ष (जीएफपी - 1), रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष (आरजी -1) असे संख्याबळ आहे. परंतु, चांगले बळ असूनही विरोधक एकसंध नसल्‍याने सरकारला जास्त त्रास होईल असे दिसत नाही.

पहिल्यांदा विधानसभेत पोहोचलेले आप आणि आरजी यांनी एकला चलोची भूमिका घेतली आहे. दोन्ही पक्षाच्या आमदारांनी जनतेकडून प्रश्‍न मागवले आहे. जनतेला असलेल्या समस्या आमदारांच्या ई-मेलवर पाठवण्याची सूचना केली आहे. तसेच दोन्ही आप आणि आरजी यांनी स्वतंत्ररपणे विरोधकाची भूमिका बजावणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा अधिवेशन सरकार सांभाळून घेणार असल्याचे दिसत आहे.

Pramod Sawant
रेल्वे मार्ग विस्ताराबाबत जुलैमध्ये खटला सुरू

युती करून निवडणूक लढलेल्‍या काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी काँग्रेस गंभीर नसल्याची टीका केली आहे. स्वतः सरदेसाई यांनी काँग्रेसपासून अंतर ठेवला आहे. त्यात काँग्रेसमध्ये नेहमीप्रमाणे गटबाजी सुरू आहे. विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यावर सरकारकडून दबावाचा डावपेच सुरू असून, ते आपल्याच पक्षात एकटे पडले आहे. पक्षाकडून त्यांना पुरेसा पाठिंबा मिळत नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com