Drug Case Dainik Gomantak
गोवा

Drug Case: अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी दिवसभरात 2 कारवाया

गोवा पोलिसांनी अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोन जणांना अटक केली.

दैनिक गोमन्तक

गोवा: गोवा पोलिसांनी अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोन जणांना अटक केली. यातील एकजण नायजेरियन नागरिक आहे, तर दुसरा मोरजी येथील रहिवासी आहे. 6 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत.

(Nigerian & Morjim resident arrested with drugs worth Rs 6 lakh)

नायजेरियातील ओनेगबू उचे जस्टस आणि मोरजी येथील श्याक इस्माईल खान अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे एमडीएमए आणि एक्स्टसी हे अंमली पदार्थ आढळून आले.

तर दुसरीकडे, कोलवाळ पोलिसांनी अनिकेत कुमार (२३, रा. वेर्णा व मूळ बिहार) यास अटक करून त्याच्याकडून अडीच लाखांचा अडीच किलो बात गांजा जप्त केला.

Anjuna येथे 18 लाखाचे अमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

गोवा पोलिसांचा अमली पदार्थ विरोधातील कारवाईचा धडाका सुरूच आहे, दिनांक 18 ऑक्टोबर रोजी गोव्यात येणाऱ्या अमली पदार्थ विरोधात मोठ्या कारवाया झाल्या असताना गोव्यातील हणजूण येथे तब्बल 18 लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केले आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की आज दिनांक 19 ऑक्टोबर रोजी गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला हणजूण येथे काही व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरुन पोलिसांनी कारवाई करत कोकेन,एलएसडी आणि चरस हे अमली पदार्थ बाळगणाऱ्या देवीदास नाईक आणि ज्योती नाईक या भावंडांना अटक केली आहे.

या कारवाईत पोलिसांनी तब्बल 18 लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले असून संशयित आरोपींचा यापुर्वी काही गुन्ह्यात समावेश घेतला आहे का? याचा तपास सुरू आहे अशी माहिती हणजूण पोलिसांनी दिली आहे. या कारवाईतील आरोपींची नावे अथवा अधिकची माहीती समजु शकलेली नाही. तसेच आरोपी नेमके कोणत्या उद्देशाने अमली पदार्थ घेऊन आले होते. याबाबत ही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT