Goa: एफडीएच्या कारवाईत मडगाव येथील मिठाईवाल्याकडून तब्बल 1.20 लाखांचा मावा जप्त

गलिच्छ जागेत उत्पादन चालू असल्याने येथील बेंगलोर बेकरीलाही ठोकले टाळे
जप्त केलेल्या मालाची सोनंसोडो येथे विल्हेवाट लावताना एफडीएचे अधिकारी
जप्त केलेल्या मालाची सोनंसोडो येथे विल्हेवाट लावताना एफडीएचे अधिकारीDainik Gomantak

मडगाव: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त मावा आणि इतर पदार्थ आले असून एफडीए त्याविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली आहे. काल अशाच एका केलेल्या कारवाईत शांतीनगर रावणफोंड येथील मेसर्स श्री कांतीलाल प्रजापत या आस्थापनावर धाड घालून 1.20 लाखांचा मावा जप्त केला. त्यापूर्वी परवा म्हापसा आणि फातोर्डा येथे केलेल्या कारवाईत एफडीएने 1.57 लाखांचा मावा जप्त केला होता.

(As much as 1.20 lakhs worth of Mawa was seized from a confectioner in margao in FDA action)

जप्त केलेल्या मालाची सोनंसोडो येथे विल्हेवाट लावताना एफडीएचे अधिकारी
Goa Government: कामगारांच्या किमान वेतनात लवकरच सुधारणा केली जाईल; बाबूश मोन्सेरात

एफडीए अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा मावा कुठून आणला त्याबद्दल कुठलीही माहिती नव्हती. त्याचे उत्पादन कधी झाले, तो गोव्यात कशा रीतीने आणला त्याबद्दल काहीच या मालावर उल्लेख नव्हता. हा माल नंतर सोनसोड्यावर नेऊन त्याची रीतसर विल्हेवाट लावण्यात आली.

काल एफडीए अधिकाऱ्यांनी काही बेकऱ्यावर कारवाई केली. गलिच्छ वातावरणात उत्पादन चालू असल्याबद्दल नावेली येथील बेंगलोर बेकरी तर परवाना नसताना उत्पादन करत असल्यामुळे रावणफोंड येथील बेंगलोर अय्यंगार बेकरीला टाळे ठोकण्यात आले. तर डीके बेकरी विरोधात नोटीस बजावली गेली. येथे कुठलाही उत्पादन तपशील न लिहिता साठवून ठेवलेली फरसाणही जप्त करण्यात आला. त्यापूर्वी परवा एफडीए परराज्यातून बस मधून गोव्यात पाठविलेले 30 हजार रुपयांचे पराठे जप्त केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com