Dr Ketan Bhatikar Death Case Dainik Gomantak
गोवा

Ketan Bhatikar Death: भाटीकरांच्‍या मृत्‍यूचा कर्नाटक पोलिसांकडून तपास सुरू; मिकी पाशेकोंच्‍या तक्रारीची दखल; कोर्टात जाण्‍याचीही काहींची तयारी

Ketan Bhatikar Death Case: डॉ. केतन भाटीकर यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आता कर्नाटक पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रामनगर पोलिस स्थानकाने या प्रकरणाची अधिकृत फाईल उघडली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: डॉ. केतन भाटीकर यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आता कर्नाटक पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रामनगर पोलिस स्थानकाने या प्रकरणाची अधिकृत फाईल उघडली आहे. डॉ. भाटीकर यांचा मागील आठवड्यात सर्पदंशामुळे मृत्यू झाला होता. ही घटना अनमोड घाट परिसरात घडली होती, जो रामनगर पोलिस स्थानकाच्या हद्दीत येतो.

मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे गोव्यात आणल्यानंतर जाहीर करण्यात आले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी मंत्री मिकी पाशेको यांनी रामनगर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. घटनेचे मूळ ठिकाण कर्नाटक राज्याच्या हद्दीत असल्याने या प्रकरणाचा तपास कर्नाटक पोलिसांनी करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, रामनगर पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत तपास प्रक्रिया सुरू केली असून त्यासंदर्भातील पोचपावतीही पाशेको यांना देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राधाराव ग्रासियस यांनीही केली आहे. ही मागणी पुढे नेण्यासाठी काही जण मुंबई उच्च न्यायालयात जाण्याची तयारी करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT