Colvale Jail Assault Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail: कोलवाळ कारागृहात पुुन्हा कैद्याला मारहाण; अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, ठोसे मारून केले घायाळ

Colvale Jail Assault: कारागृहातील एकाच ब्लॉकमध्ये बंदिस्त असलेल्या कैद्यांमध्ये अंतर्गत वाद उफाळून आल्याने अंडर ट्रायल कैदी राकेश पाटील याला इतर कैद्यांनी बेदम मारहाण केली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: कारागृहातील एकाच ब्लॉकमध्ये बंदिस्त असलेल्या कैद्यांमध्ये अंतर्गत वाद उफाळून आल्याने अंडर ट्रायल कैदी राकेश पाटील याला इतर कैद्यांनी बेदम मारहाण केली. ही खळबळजनक घटना आज सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. संबंधित आरोपी आणि पीडित कैदी राकेश पाटील हे कारागृहातील एकाच ब्लॉक सुरक्षिततेत एकत्र राहत होते.

आज संध्याकाळी त्यांच्यामध्ये अचानक जोरदार वाद झाला. आरोपीने राकेश पाटील याच्यावर जोरात हल्ला चढविला. आरोपीने पाटील याच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याजवळ जोरदार ठोसे मारल्याने त्याच्या डोळ्याच्या बाजूला गंभीर दुखापत झाली आहे. जबर मारहाणीमुळे त्याच्या नाकातून रक्त वाहत होते. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांत रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंद केलेली नव्हती.

जखमी कैद्यावर गोमेकॉत उपचार

मारहाणीचा हा प्रकार लक्षात येताच तुरुंग व्यवस्थापनात एकच खळबळ उडाली आणि सुरक्षा रक्षकांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या हल्ल्यात जखमी झालेल्या राकेश पाटील याला तातडीने कारागृहातून बाहेर काढून उपचारासाठी आधी म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात आणि तेथून पुढे गोमेकॉत दाखल करण्यात आले असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT