Goa crime: मुलीशी लग्नास विरोध केल्यानेच खून; चिकणे-कुडणेतील महिलेच्या हत्येचा झाला उलगडा, संशयिताला मुंबईत ठोकल्या बेड्या

Chikne Kudne Murder Case: चिकणे-कुडणे येथील शैला संजय घाडी या ५८ वर्षीय महिलेचा खून करून फरार झालेल्या सागर रमेश राऊळ (वय ३४ वर्षे, रा. सावंतवाडी) या संशयिताला मुंबई पोलिसांच्या सहकार्याने अटक करण्यात डिचोली पोलिसांना यश आले.
Goa crime
Goa crimeDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: चिकणे-कुडणे येथील शैला संजय घाडी या ५८ वर्षीय महिलेचा खून करून फरार झालेल्या सागर रमेश राऊळ (वय ३४ वर्षे, रा. सावंतवाडी) या संशयिताला मुंबई पोलिसांच्या सहकार्याने अटक करण्यात डिचोली पोलिसांना यश आले. घाडी यांच्या धाकट्या मुलीशी विवाहाला नकार दिल्याने सागरने हे कृत्य केले.

संशयित सागर याला मीरा भाईंदर-ठाणे येथील प्रथम श्रेणी न्यायालयात ट्रान्झिट रिमांडसाठी हजर केले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून डिचोली पोलिस स्थानकात आणणार असल्याची माहिती डिचोली पोलिस स्थानकातून देण्यात आली. खून केल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या सागरच्या शोधासाठी डिचोलीचे पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार केली.

Goa crime
Odisha Crime: ओडिशात माणुसकीला काळीमा फासणारी घटना! जिल्हा रुग्णालयातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार; एका महिलेसह तिघे अटकेत

पहिल्या पथकात उपनिरीक्षक विराज धावस्कर, पोलिस कॉन्स्टेबल विशाल परब, अंकित बाळे, नरेंद्र साळस्कर तर दुसऱ्या पथकात पोलिस उपनिरीक्षक आकाश परवार, हवालदार समीर गावस, पोलिस कॉन्स्टेबल नारायण नागवेकर, दानिश शेख यांचा समावेश होता. सागरच्या शोधात ही पथके सावंतवाडी, कोल्हापूर, मुंबईसह इतर जवळपासच्या परिसरामध्ये फिरत होती.

तांत्रिक माध्यमांचा योग्य वापर तसेच महाराष्ट्रातील वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या मीरा-भाईंदर येथील गुन्हा शाखा युनिट चारच्या पोलिसांचे सहकार्य घेऊन सागरला बुधवारी (ता.२०) संध्याकाळी ५.३० वाजता ठाणे येथील द्वारका हॉटेलजवळ ताब्यात घेतले. अटक केल्यानंतर आज मीरा-भाईंदर येथील प्रथम श्रेणी न्यायालयात ट्रान्झिट रिमांडसाठी संशयिताला हजर केले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला डिचोली पोलिस स्थानकात आणण्यात येणार आहे.

Goa crime
Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

उत्तर गोवा पोलिस अधीक्षक हरीश मडकईकर, डिचोलीच्या पोलिस उपअधीक्षक श्रीदेवी बी.व्ही. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय राणे सरदेसाई आणि सहकाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी केली. पोलिस निरीक्षक विजय राणे पुढील तपास करीत आहेत.

जाता जाता दिली जीवे मारण्याची धमकी

याप्रकरणी शैला घाडी यांचे पुत्र शुभम संजय घाडी यांच्याकडून डिचोली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सागर याने शैला यांच्या धाकट्या मुलीसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला होता; परंतु या प्रस्तावास घाडी यांच्या घरच्यांकडून नकार मिळाल्याने रागाने सागरने शैला यांना जबर मारहाण केली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर पळून जाताना सागरने घरातील इतरांनाही जीवे मारण्याची धमकी दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com