New Zuari Bridge Dainik Gomantak
गोवा

New Zuari Bridge : झुआरी पूल आज मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी होणार खुला

झुआरी पूल सुरु झाल्यामुळे पणजी-मडगाव मार्गावरील कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.

आदित्य जोशी

बहुचर्चित झुआरी नदीवरील नवा केबल स्टेट पूल उद्‍घाटनानंतर आज गुरुवारी मध्यरात्रीपासून खुला केला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. झुआरी पूल सुरु झाल्यामुळे पणजी-मडगाव मार्गावरील कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी काल बुधवारी मंत्री, आमदार, पक्षाचे वरिष्ठ नेते यांची विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. मुख्यमंत्री म्हणाले, झुआरी पुलाचे उद्‍घाटन सायंकाळी 7 वाजता केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे. मात्र, लोकांसाठी हा पूल सायंकाळी 4 वाजल्यापासून खुला असेल. नागरिकांना प्रत्यक्ष पुलावर चालण्याची ही शेवटची संधी असेल. उद्‍घाटन झाल्यानंतर पुलावरचे सर्व साहित्य हटवण्यात येईल आणि रात्री बारानंतर हा पुल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.

90-10 टक्क्यांची मागणी

मुख्यमंत्री सावंत दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते. या संदर्भात ते म्हणाले, की राज्यातील केंद्रीय प्रकल्पांसाठी 60-40 टक्के अशी तरतूद आहे. 60 टक्के खर्च हा केंद्र सरकार करते. तर 40 टक्के खर्च राज्य सरकारला भरावा लागतो. मात्र, गोवा उशिरा मुक्त झाल्याने पहिल्या दोन वित्त आयोगाचा लाभ राज्याला मिळाला नाही. त्यामुळेच राज्यात राबवल्या जाणाऱ्या केंद्रीय योजनांसाठी 90 टक्के खर्च केंद्राने करावा आणि 10 टक्के खर्च राज्य सरकार करेल, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

ॲपसाठी 650 पेक्षा अधिक नोंदणी

दुसरीकडे राज्यातील खासगी बसेससाठी 26 जानेवारीला विशेष योजना जाहीर होईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तर टॅक्सी ॲप 5 जानेवारीपासून सुरू होईल. आतापर्यंत 650 पेक्षा अधिक व्यावसायिकांनी ॲपसाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती मंत्री खंवटे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT