Chartered Plane to Goa : किर्गिस्तानचे पहिले चार्टर विमान गोव्यात दाखल

2022-23 हंगामातील किर्गिस्तानचे पहिलेच विमान असून त्यातून सुमारे 170 प्रवासी गोव्यात दाखल झाले आहेत.
Chartered Plane to Goa
Chartered Plane to GoaDainik Gomantak

Chartered Plane to Goa : गोव्यात पर्यटन हंगाम सुरू झाला असून किर्गिस्तानमधून कॅपर ट्रॅव्हल कंपनीचे ॲरो नोमाड एअरलाईन्सचे पहिले चार्टर विमान आज 29 डिसेंबरला सकाळी दाबोळी विमानतळावर दाखल झालं आहे. यापुढेही हे विमान आठवड्यातून एक दिवस गोव्यात येणार आहे. या 2022-23 हंगामातील किर्गिस्तानचे पहिलेच विमान असून त्यातून सुमारे 170 प्रवासी गोव्यात दाखल झाले आहेत.

गोव्यात दाखल होताच कझाकस्तानमधील पर्यटकांचं गुलाबाचं फुल देत ब्रास बँडच्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मार्चपर्यंत ही चार्टर सेवा सुरु असेल, असा विश्वास टूर ऑपरेटर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

गोव्यात सध्या रशिया व युकेमधून सर्वाधिक चार्टर विमान दाखल झाली आहेत. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ 5 जानेवारीपासून कार्यरत होणार असल्याने काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या चार्टर विमाने मोपा विमानतळावर उतरवणार आहेत. आता किर्गिस्तानचे हे चार्टर विमान दाबोळीवर उतरल्यानंतर पुढील विमाने अधिक करून मोपा विमानतळावर उतरण्याची अधिक शक्यता आहे.

Chartered Plane to Goa
New Zuari Bridge: इंदिरा गांधींची वाट न पाहता किरण बेदींनी लोकांसाठी खुला केला झुआरी ब्रिज; काय आहे प्रकरण?

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वतोपरी सज्ज असल्याने अधिकाधिक आंतरराष्ट्रीय विमाने या ठिकाणी उतरतील. त्याचबरोबर दाबोळी विमानतळही कार्यरत असल्याने कंपनीच्या इच्छेनुसार त्यांना विमाने उतरवण्यासाठी पर्याय ठेवण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी गोव्यात येणाऱ्या चार्टर विमानाची संख्या वाढणार असून पर्यटकांच्या संख्येतही वाढ होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com