Goa government education Dainik Gomantak
गोवा

New Education Policy: 10 वी नंतर 'या' इयत्तांसाठी होणार NEP ची अंमलबजावणी, पाठ्यपुस्तकांमध्ये होणार बदल

Goa Education: इयत्ता तिसरीचे वर्ग हे जून महिन्यात भरणार असल्याने त्यांना जूनपासून नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Sameer Panditrao

पणजी: राज्यात शालेय स्तरावर टप्प्याटप्याने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत असून यंदा जशी इयत्ता दहावीला अंमलबजावणी करण्यात येत आहे तशीच ती इयत्ता तिसरी आणि सहावीलादेखील करण्यात येणार आहे. त्यासंबंधी आवश्‍यक असणारी पूर्वतयारी पूर्ण करण्यात आल्याचे ‘एससीईआरटी’च्या संचालक मेघना शेटगावकर यांनी सांगितले.

दरम्यान, शेटगावकर म्हणाल्या की, इयत्ता सहावीचे वर्ग ७ एप्रिलपासून सुरू होणार असल्याने त्यांना लागणारी नवी पाठ्यपुस्तके यापूर्वीच पुरविण्यात आली आहेत. यंदा इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना त्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्येही बदल होणार आहे.

शिक्षणाचे स्वरूप काही प्रमाणात बदलणार आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम कळावा तसेच त्यांच्या स्पर्धात्मक मूल्याधिष्ठित शिक्षणाला चालना मिळावी यासाठी सुरुवातीला ब्रीज कोर्सच्या माध्यमातून त्यांची क्षमता विकसित केली जाणार आहे. ज्यासाठी विद्यार्थांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिकविले जाणार आहे.

इयत्ता तिसरीचे वर्ग हे जून महिन्यात भरणार असल्याने त्यांना जूनपासून नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बदल होणार आहे. नवीन अभ्यासक्रम असणार आहे. विद्यार्थ्यांना ‘एनसीईआरटी’च्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके असणार आहेत. मराठी आणि कोकणीची पुस्तके मात्र पूर्णतः ‘एनसीईआरटी’च्या मार्गदर्शनाखाली ‘एससीईआरटी’च्या समितीद्वारे तयार केली आहेत.

इयत्ता सहावीसाठीचे बदल

विद्यार्थ्यांना दोन सत्रांत शिकविण्यात येणार.

विद्यार्थ्यांचे मूल्यांकन हे प्रात्यक्षिक आणि सैद्धांतिक परीक्षा अशा दोन्ही माध्यमातून करण्यात येणार आहे.

भाषा (मराठी, कोकणी, इंग्रजी किंवा इतर) गणित, विज्ञान आणि सामाजिक विज्ञान या विषयांमध्ये दोन क्षमता आधारित ५० गुणांच्या सत्रांत ‘एमसीक्यू’ परीक्षा घेतल्या जातील.

परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिका राज्य प्रशिक्षण आणि संसोधन परिषदेकडून देण्यात येतील.

उत्तरपत्रिका चाचणी शालेय पातळीवरच होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT