Goa Education: "पावसाळ्यापूर्वी सर्व शाळा सुविधांनी सुसज्ज करा", मुख्यमंत्री CM सावंतांची सूचना

Goa School: मॉन्सूनपूर्व कामे कुठपर्यंत आली आहेत, हे पाहण्यासाठी दर पंधरा दिवसांनी साबांखा आणि शिक्षण या खात्यांची संयुक्त आढावा बैठक होणार आहे.
Goa Education
Goa EducationDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्यातील सर्व सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची मॉन्सूनपूर्वी डागडुजी करावी, ज्या शाळेत पंखे नाहीत, जेथे प्युरिफायर नाहीत किंवा इतर गोष्टींची कमतरता असेल, तर त्या पुरवाव्यात आणि मॉन्सूनपूर्वी सर्व शाळा सुसज्ज कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ईडीसी येथे सार्वजनिक बांधकाम खाते आणि शिक्षण संचालनालयाच्या संयुक्त आढावा बैठकीत केल्या.

यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, ‘एससीईआरटी’चे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

या बैठकीत राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या स्थितीबाबत तालुकावार आढावा घेण्यात आला.

Goa Education
Goa Assembly Election: भाजप 'मगो'ला सोबत घेऊनच विधानसभा लढणार; ढवळीकरांना दिल्लीत आश्वासन

दर १५ दिवसांनी होणार बैठक

मॉन्सूनपूर्व कामे कुठपर्यंत आली आहेत, हे पाहण्यासाठी दर पंधरा दिवसांनी साबांखा आणि शिक्षण या खात्यांची संयुक्त आढावा बैठक होणार आहे.

पुढील आढावा बैठका या १५ एप्रिल, ३० एप्रिल, १५ मे आणि ३० मे रोजी होणार असून मॉन्सूनपूर्वी सर्व शाळा सर्व सोयींनी सज्ज करण्यात येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Vaibhavi IIT success story
India Slams Pakistan UN General Assembly
Goa Assembly Election 2027
India Slams Pakistan Terror Safe Havens UNSC
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com