Ration Shop Owners Goa Dainik Gomantak
गोवा

Ration Shops Color Code: स्वस्त धान्य दुकानांना आता ‘कलर कोड’! वाहतूकखर्च दिला जाणार किलोमीटरनुसार

Goa Ration Shop Owners: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकरिता केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात सर्व स्वस्त धान्य दुकानांना ‘कलर कोड’ दिला जाणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

All Ration Shops to be Assigned Color Codes

पणजी: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकरिता केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सोमवारी सकाळी त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात सर्व स्वस्त धान्य दुकानांना ‘कलर कोड’ दिला जाणार आहे. त्याशिवाय धान्य वाहतुकीसाठी पूर्वी निश्चित खर्च ठरवून दिला होता, त्यात आता बदल करून तो किलोमीटरनुसार दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात नागरी पुरवठा खात्याने हा कार्यक्रमाचे आयोजित केला होता. संचालक जयंत तारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा पार पडला. या मेळाव्याविषयी माहिती देताना उपसंचालक तुळशीदास दाभोळकर यांनी सांगितले की, स्वस्त धान्य दुकानदारांना आत्तापर्यंत आपणास फायदा होत नसल्याचे दिसत होते, त्यांच्या समस्या जाणून त्यांच्यासाठी योजना आणण्याचे सरकारने योजले आहे.

जेणेकरून त्यांची व्यवहार्यता अधिक सुधारली जाईल. स्वस्तधान्य दुकानांना मिळणाऱ्या नफ्याची (मार्जीन) रक्कम वाढविण्यासाठी, दुकानांमध्ये काही वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे.

बक्षीसप्राप्त स्वस्त धान्य दुकानदार

पेडणे : आशालता नाईक, गोविंद गडेकर

सत्तरी : नगरगाव ग्रुप विकास क्रेडिट सोसायटी, सागर शिरोडकर

डिचोली : वन ग्रुप विकास सेवा सोसायटी, सुहानी परब

तिसवाडी : वृंदा नाईक, संदीप भोंसुले

बार्देश : शैलेश म्हांबरे, धुळेर विकास सेवा सोसायटी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT