Nesai Road Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: नेसाय येथे भरधाव दुचाकींची एकमेकांना धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; एकजण जखमी

Nesai Road Accident: नेसाय येथील कार्बन फॅक्टरीजवळ दोन दुचाकींमध्ये अपघात होऊन गंभीर जखमी झालेला अब्दुल बाशाकद्री या 21 वर्षीय तरुणाचा दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

Manish Jadhav

Nesai Road Accident 21 Year Old Rider Dies South Goa Hospital

मडगाव: नेसाय येथील कार्बन फॅक्टरीजवळ दोन दुचाकींमध्ये अपघात होऊन गंभीर जखमी झालेला अब्दुल बाशाकद्री या 21 वर्षीय तरुणाचा दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातातील दुसरा दुचाकीस्वार शरद मळकर्णेकर हाही जखमी झाला आहे.

भरधाव दुचाकींचा अपघात

दरम्यान, शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात (Accident) झाला. अब्दुल हा मिनेझिस भाट, सां जुझे दी अरियाल येथील रहिवासी आहे. दोन दुचाकींची भर वेगाने धडक झाल्याची माहिती मायणा-कुडतरी पोलिसांनी दिली. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक सागर कामत याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

मडगाव-कारवार रस्त्यावर अपघात

यापूर्वी, मडगाव-कारवार रस्त्यावर शनिवारी सकाळी एका ट्रकचा अपघात झाला होता. हा ट्रक (KA 22 C 9587) कर्नाटकचा होता. ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रक रस्त्याकडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळला होता. दरम्यान, या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक (Transportation) विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त ट्रक रस्त्यातच असल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. संथगतीने वाहतूक पुढे सरकत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT