Goa Electricity Dainik Gomantak
गोवा

मांद्रेत वीज खात्याकडून दुरुस्तीत हलगर्जीपणा

कामांची माहिती द्या : स्वराज्य संस्थेची मागणी

दैनिक गोमन्तक

मोरजी: दोन दिवसांपूर्वी जुनसवाडा-मांद्रे येथे तब्बल सोळा तास वीज गायब झाली होती. वारंवार वीज खात्याला फोन करूनही दुरुस्तीसाठी हलगर्जीपणा केल्याने सोळा तास लोकांना विजेविना राहावे लागले.

(Negligence in repair by Mandrem power department)

वारंवार वीजप्रवाह खंडित करून कोणती कामे केली जातात, याची माहिती जनतेला द्यावी, अशी मागणी मांद्रे येथील स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष किशोर शेट मांद्रेकर यांनी केली.

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वीज कार्यालयाला भेट दिली असता, आज शनिवार असल्याने आगरवाडा उपवीज केंद्र कार्यालय बंद असल्याने काही पदाधिकाऱ्यांनी वीज अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला.

उद्या 22 रोजी संपूर्ण पेडणे तालुक्यात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यावेळी कोणकोणती कामे हाती घेतली जाणार, याची माहिती अधिकाऱ्यांनी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर एका अधिकाऱ्याने संस्थेचे अध्यक्ष मांद्रेकर यांना तुम्हाला माहिती हवी असल्यास लेखी स्वरुपात निवेदन द्या, असे सुनावले. मांद्रेकर यांनी वीजमंत्र्यांना याबाबत माहिती दिली. यावेळी शंकर गोवेकर, जगन्नाथ पार्सेकर आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

SCROLL FOR NEXT